Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

हिंगोली पोलिसांनी उघड केले बाळापुर हद्दीतील दोन घरफोडीचे गुन्हे,मुद्देमाल हस्तगत….

13


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

रेकॅार्डवरील संशयीतांना ताब्यात घेऊन हिंगोली पोलिसांनी उघड केले आखाडा बाळापुर हद्दीतील दोन घरफोडीचे गुन्हे उघड एकुण ३ लाख ४१ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त,पो.स्टे आ. बाळापुर व स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांची कामगिरी…..

बाळापुर(हिंगोली) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १०/०४/२०२४ रोजी पो.स्टे आखाडा बाळापुर हद्दीतील मौजे कामठा येथील फिर्यादी सतिश कदम यांचे घरी रात्री चे दरम्यान त्याचे घराचे कुलुप तोडुन घरात लोखडी कपाटामध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागीने व नगदी रक्कम अज्ञात आरोपीनी चोरून नेली होती त्याबाबत फिर्यादी याचे तक्रारी वरून पो.स्टे आखाडा बाळापुर येथे गु.र.न २०९/२०२४ कलम ४५७,३८० भादवी प्रमाणे गुन्हा दाखल होता.

तसेच दुसऱ्या घटनेत दिनांक ०५/०५/२०२४ रोजी बाळापुर शहरातील फिर्यादी माधव मोरे हे घराला कुलुप लावुन बाहेरगावी गेले असता अज्ञाताने त्याची संधी साधुन घराचे कुलुप तोडुन घरातील कपाटामध्ये ठेवलेली नगदी रक्कम चोरून नेली होती. त्याबाबत फिर्यादी यांचे तक्रारीवरून पो.स्टे आखाडा बाळापुर येथे गु.र.न २५७ / २०२४ कलम ४५७, ३८० भादवी प्रमाणे दाखल झाला होता.

सदरचे गुन्हे उघड करणे बाबत पोलिस अधीक्षक जी, श्रीधर यांनी पो.स्टे आखाडा बाळापुर व स्थानिक गुन्हे शाखा यांना सुचना देवुन मार्गदर्शन केले होते त्यानुसार स्थागुशा चे सपोनि राजेश मलपिलु आणि त्यांचे पथक तसेच पोस्टे. बाळापुर चे प्रभारी अधिकारी सपोनि सुनिल गोपीनवार आणि त्यांचे पथकाने तात्काळ दोन्ही घटनास्थळी भेट देवुन तपासाची चक्रे गतीमान करून व गोपनीय बातमीदाराच्या मदतीने तपास करत माहीती घेतली असता सदर गुन्हे पो.स्टे बाळापुर हधीतील पेठवडगाव येथील संजय हनुमंता काळे व पावनमारी गावातील माधव हनुमान पवार यांनी त्याचे नांदेड, लातुर व यवतमाळ येथील नातेवाईकासोबत मिळुन केल्याचे तपास पथकाला माहीती मिळाली तसेच सदरचे सर्व गुन्हेगार पावनमारी गाव परीसरामध्ये आल्याची माहीती मिळाल्यावरून पो.स्टे आ. बाळापुर व स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सापळा रचुन अतीशय शिताफिने १) संजय हनुमंता काळे व २) माधव हनुमान पवार सोबत त्याचे ३) राहुल रमेश मुधळकर रा. उदगीर जि. लातुर, ४) करण रामचंद्र मंजुळकर रा. दिग्रस ता. दारव्हा जि. यवतमाळ,
५) राजु प्रकाश मंजुळकर रा. आंबानगर नांदेड ता. जि. नादेंड यांना ताब्यात घेवुन विचारपुस करता त्यांनी वर नमुद दोन्ही घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली

त्याचे कडुन वरील घरफोडीच्या गुन्हयातील खालील प्रमाणे नगदी रुपये दागीने मोटार सायकल व मोबाईल जप्त करण्यात आले १) ४५,००० रूपये नगदी ज्यात ५०० रुपये दाराच्या ९० नोटा २) एक १० ग्रॅम वजनाची सोन्याची गहु मण्याची पोथ ३) एक १० तोळे चांदीची साखळी ४) एक लहान मुलाचे चांदीचे कडे जोड १५ तोळे वजनाचे ५) पायातील चांदीचे जोडवे २ तोळे वजनाचे ६) पायातील चांदीचे चैन जोड ३ तोळे वजनाचे सोबतच गुन्हा करतांना गुन्हयात वापरलेले एक बजाज कंपनीची व होंडा कंपनीची असे दोन मोटार सायकल व तिन मोबईल असा नगदी रुपये, सोन्या चांदीचे दागीने, मोटार सायकल व मोबाईल असा एकुण ३ लाख ४१ हजार
रुपयाचा मुद्देमाल व सोबत गुन्हा करण्यासाठी वापरलेले लोखंडी टॉमी जप्त करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, स्थागुशा पोलिस निरीक्षक विकास पाटील यांचे मार्गदशनाखाली सपोनि सुनिल गोपीनवार, सपोनि राजेश
मलपिलु, पोउपनि शिवाजी बोंडले, बालाजी गोणारकर,सफौ मधुकर नागरे, सुनिल रिठ्ठे, नागोराव बाभळे, शेख बाबर, गजानन पोकळे, विठठल काळे, ज्ञानेश्वर पायघन, गणेश लेकुळे, शिवाजी पवार,
पिराजी बेले, अरविंद जाधव, तुषार ठाकरे, दत्ता नागरे यांनी केली

Leave A Reply

Your email address will not be published.