Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीस १० वर्षानंतर सदर पोलिसांनी घेतले ताब्यात….

9


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

दहा वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला नागपूर शहर पोलिसांनी केली अटक…

नागपूर (शहर प्रतिनिधी) – फिर्यादीला क्यु बे तु ज्यादा बडा हो गया है क्या असे बोलुन आपसात संगणमत करून फिर्यादी यांना शिवीगाळ करून मारहाण करून तसेच आरोपीने आपल्या जवळील असलेल्या लाकडी दाळयाने फिर्यादी यांचा डोक्यावर मारून जखमी केले. फिर्यादी यांचा डोक्यातुन रक्त निघाल्याने तिन्ही आरोपी तेथुन पळून गेले तसेच तिन्ही आरोपी यांनी पळता पळता फिर्यादीस म्हटले की अगर तुने रिपोर्ट दिया तो तुझे मारेंगे व तेथुन पळुन गेले अशी फिर्याद फिर्यादी जमिल शेख वल्द तमील शेख, (वय 24 वर्ष), रा.कोराडी, महादुला जयभीम नगर, प्रभाग क्र.02. बाबाजी किराणा स्टोर्स समोर, पो.ठाणे सदर, नागपुर यांचे रिपोर्ट वरून पो.ठाणे सदर, अप.क्र. 96/2014 कलम 324, 506, 34 भादंवि अन्वये गुन्हा नोद करण्यात आला होता.

या बाबत अधिक माहिती अशी की, नमुद गुन्हयातील फिर्यादी हे (दि.09मार्च 2014) रोजी आपल्या श्री व्हिलर सवारी ऑटो ने भरण्याकरीता एन.आय.टी समोर बिशॉप कॉटन शाळेजवळ, दुपारी अंदाजे 04.00 वा. दरम्यान थांबले असता यातील पहिला आरोपी करूणाकर हिशलाल पांडे (वय 22 वर्ष), रा.कोराडी महादुला, नागपुर दुसरा आरोपी शेख इस्ताक वल्द शेख हबीब, (वय 40 वर्ष), रा.वॉक्स कुलर, कोराडी रोड, नागपुर, फरार तिसरा आरोपी शेख फिरोज वल्द शेख फारूख, (वय 25 वर्ष), रा.वॉक्स कुलर, कोराडी रोड, नागपुर, हे फिर्यादी यांचे जवळ येवुन फिर्यादी यांना म्हटले की, ” क्यु बे तु ज्यादा बडा हो गया है क्या” असे बोलुन तिन्ही आरोपी यांनी आपसात संगणमत करून फिर्यादी यांना शिवीगाळ करून हातबुक्कीने मारहाण केली तसेच पहिल्या आरोपीने आपल्या जवळील असलेल्या लाकडी दाळयाने फिर्यादी यांचा डोक्यावर मारून जख्मी केले. फिर्यादी यांचा डोक्यातुन रक्त निघाल्याने तिन्ही आरोपी तेथुन पळून गेले तसेच तिन्ही आरोपी यांनी पळता पळता फिर्यादीस म्हटले की अगर तुने रिपोर्ट दिया तो तुझे मारेगे” व तेथुन पळुन गेले अश्या फिर्यादी यांचे रिपोर्ट वरून पो.ठाणे सदर, अप.क्र. 96/2014 कलम 324, 506, 34 भादंवि अन्वये गुन्हा नोद करण्यात आला.

प्रस्तुत गुन्हयातील तिन्ही आरोपी पैकी पहिल्या आणि दुसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली होती. त्याचे विरूध्द दोषारोपपत्र तयार करून न्यायालयात सादर करण्यात आले असुन तिसरा आरोपी हा फरार असल्याने त्याचे विरूध्द कलम 299 फरार प्रमाणे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

(दि.04जून) रोजी पेट्रोलिंग दरम्यान गुन्हे प्रकटीकरणातील अंमलदार हे पेट्रोलिंग करीत असतांना एक संशयीत इसम काळया रंगाची शर्ट व खाकी रंगाचा पॅन्ट परिधान केलेला इसम हा पोलिसांना पाहुन पळताना दिसुन आला त्यावरून त्यास अत्यंत शिताफिने घेराव करून त्यास ताब्यात घेतले असता त्यास पळुन जाण्याचे कारण विचारले असता त्यास त्याने नमुद गुन्हयाची कबुली दिली त्यावरून पो.ठाणे अभिलेखाची पाहणी केली असता पो.ठाणे सदर अप. क्र.96/2014 कलम 324, 506, 34 भा.दं.वी या गुन्हयात पाहिजे असल्याचे दिसुन आले. त्यावरून त्याचे वैद्यकिय तपासणी करून अटक करण्यात आली.

नमुद गुन्हयात 10 वर्षा पासुन पाहिजे आरोपी शेख फिरोज वल्द शेख फारूख, (वय 25 वर्ष), रा.गैस गोडावुन जवळ, वॉक्स कुलर जवळ, पो.ठाणे सदर, नागपुर यास अटक करण्यात आले नमुद कारवाईमध्ये वरिष्ठांचे मार्गदर्शनात नमुदची कारवाई करण्यात आली आहे.

अशा प्रकारे सदरची कारवाई पोलिस आयुक्त डॅा रविंद्कुमार सिंघल,सहपोलिस आयुक्त अस्वती दोरज,अपर पोलिस आयुक्त(उतर विभाग)प्रमोद शेवाळे, पोलिस उप आयुक्त परिमंडळ २ राहुल मदने,  सहायक पोलिस आयुक्त, सदर विभाग, माधुरी बावीस्कर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे,पोलिस निरीक्षक (गुन्हे) अरुण क्षिरसागर, पोउपनि निलेश घोगरे, पोलीस मसपोनि. विजया म्हेत्रे, पो.हवा दुर्गेश ठाकुर,अमोल दौदंलकर, रविन्द्र लाड, नापोशि संजय यादव,मोहनसिंग ठाकुर, सय्यद हबीब, पोशि सचिन कावळे, राजेन्द्र वानखेडे, धनपत माझरेते, विक्रमसिंग ठाकूर, सर्व नेमणुक पोलीस ठाणे सदर, नागपुर शहर यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.