Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंद्यांसाठी किर्तन

10

पुणे,दि.०८:- येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंद्यांसाठी किर्तन सोहळ्याचे आयोजन. वारकरी आचारसंहिता परीषद तथा हरिभक्त परायण. निलेश महाराज झरेगावकर संकल्पित राष्ट्रसंत आचार्य परमपूजनीय स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंद्यांसाठी किर्तन सोहळा दि.०७.०६.२०२४ रोजी पार पडला. माऊली संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ” जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो” या पसायदानाच्या आकांक्षाचे प्रत्यक्ष प्रकटीकरण करणारा किर्तन सोहळा पार पडला. सदर किर्तन सोहळ्यात राष्ट्रसंत आचार्य परमपूजनीय स्वामी गोविंददेव गिरी महाराज व निलेश महाराज झरेगावकर यांनी मार्गर्शन केले.

कारागृहातील चार भिंतीच्या आत बंदीस्त बंदीजनांच्या मनावर किर्तनाच्या अभिसिंचनाने मन परीवर्तन घडवुन ‘नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी” या जाणिवेतून त्यांच्या अंतरीच्या ज्ञानदीप प्रज्वलित होईल. भक्तीच्या शक्तीची महती संक्रमित करण्यास हा उपक्रम सर्वार्थाने यशस्वी होईल. सदर उपक्रम अमिताभ गुप्ता (भा.पो.से) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से) विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संकल्पनेतून व श्रीमती. स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.

सदर उपक्रमाचे यशस्वी नियोजनासाठी सुनिल एन ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, अनिल खामकर, अधीक्षक, येरवडा खुले कारागृह, डॉ. भाईदास ढोले, उपअधीक्षक, श्रीमती. पी. पी. कदम उपअधीक्षक, एम. एच. जगताप, उपअधीक्षक, श्रीमती. मंजीरी कुलकर्णी, पोलीस निरीक्षक, दक्षता पथक, उपमुख्यालय, पश्चिम विभाग, पुणे, आनंदा एस कांदे, वरीष्ठ तुरुंगाधिकारी, सी आर सांगळे, तुरुंगाधिकारी श्रेणी-०२, व्ही. के. खराडे, सुभेदार तसेच भजनी मंडळ, देवाची आळंदी यांनी कामकाज पाहीले.

Leave A Reply

Your email address will not be published.