Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जनावर चोरी करणारी आंतराज्यीय टोळी परभणी गुन्हे शाखेच्या ताब्यात,२५ गुन्हे केले उघड…

10


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

जनावर चोरी करणार्या आंतरराज्यीय टोळीचा परभणी गुन्हे शाखेने केला पर्दाफाश,एकुन २५ गुन्ह्याची केली उकल….

परभणी(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गेल्या काही दिवसांपासुन जिल्ह्यात जनावर चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत यात काही बाहेरच्या टोळ्या सक्रीय झाल्याचे निर्दशनात आले आहे याअनुषंगाने सदर जनावर चोरी करणार्यांचा छडा लावुन त्यांना जेरबंद करण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी यांनी पोलिस निरीक्षक स्थागुशा अशोक घोरबांड यांना दिल्या आहेत

त्याअनुषंगाने पो.नि.स्था.गु.शा. अशोक घोरबांड यांना गोपनिय माहिती मिळाल्यावरून व तांत्रीक विश्लेषनाच्या आधारे स्था. गु.शा. चे स.पो.नि.पी. डी. भारती, राजू मुत्येपोड, पोउपनि गोपीनाथ वाघमारे,
अजित बिरादार, चंदनसिंह परिहार यांचे पथके तयार करून रवाना करण्यात आले होते पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे यातील आरोपी 1) गजानन काशिनाथ वाघमारे, वय 34 वर्षे, रा.
शांतीनिकेतन कॉलनी, परभणी यास ताब्यात घेतले असता त्याने व त्याचे साथीदार 2) जाकेर मन्सार कुरेशी, वय 34 वर्षे रा. जमजम कॉलनी दर्गा रोड परभणी व 3) सुरेश देवराव खिल्लारे, वय 34 वर्षे, रा.मंत्री नगर, पंचशील नगर परभणी या आरोपींना स्था. गु.शा. च्या पथकाने सापळा रचून मोठ्या शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेतले असता त्यांनी त्यांचे हरियाना राज्यातील व स्थानिक इतर 10 साथीदारांच्या मदतीने अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली.त्यावरून परभणी जिल्ह्यातील 13 व जालना – 1 वाशीम-2, नांदेड-3, लातूर- 3 व हिंगोली -3 असे एकूण 25 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. ज्यात गुन्हे करण्यासाठी वापरण्यात आलेले हत्यार, मोबाईल व नगदी 1,68,500/- रुपये व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 5,68,500 /- रु चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला असून त्यांचे इतर साथीदारांना ताब्यात घेतल्यानंतर अजून गुन्हे उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही

याबाबतीत आरोपीकडे इतर राज्यात स्वतंत्र पथके फरार आरोपी शोध घेवून तपास करण्यात येत असल्याचे पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांनी सांगीतले आहे. तसेच दि(26)मे रोजी 04.15 वा. चे सुमारास पोलिस नियंत्रण कक्ष परभणी येथे माहिती मिळाली होती की एक वाहन संशयीत रित्या परभणी च्या दिशेने येत आहे. त्यावरून पुर्णा पोलिस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार त्याचा शासकिय वाहनाने पाठलाग करीत असतांना सदर आरोपीना दगडफेक करून पोलिसांवर हमला केल्याची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे. त्यावरून पो.स्टे. पुर्णा येथील गु.र.नं. 178 / 2024 कलम 353, 336, 427 भा. दं. वि. अन्वये गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याची देखील उकल झालेली आहे त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्यासह राज्यातील विविध जिल्ह्यात जनावर चोरणारी टोळीचा पर्दाफाश करत परभणी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकूण 6 जिल्ह्यातील 25 गुन्ह्यांचा उलगडा केला असून 1,68,500/- रुपये नगदी व गुन्ह्यात वापरलेले वाहन हत्यारे जप्त करण्यात आलेली आहेत. तसेच सदर आरोपींनी यापुर्वी रात्र गस्त करणाऱ्या वसमत जि. हिंगोली व पुर्णा पोलीसांवर हल्ला केल्याचा गुन्ह्याची देखील उकल झाली आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली व अपर पोलिस अधीक्षक  यशवंत काळे नेतृत्वाखाली पो. नि. स्था.गु.शा. अशोक घोरबांड, स.पो.नि. भारती,स.पो.नि.मुत्येपोड, पोउपनि गोपिनाथ वाघमारे व पोउपनि अजित बिरादार, चंदनसिंग परिहार पोलीस अंमलदार बालासाहेब तुपसमूद्रे, रवि जाधव, दिलावर पठाण, रफियोद्दीन शेख, निलेश परसोडे, विलास सातपूते, राहूल परसोडे,रंगनाथ दुधाटे, सचिन भदरर्गे, विष्णू चव्हाण, सिध्देश्वर चाटे, हनुमान ढगे, संजय घुगे, नामदेव डुबे, मधुकर ढवळे, राम पौळ, दिलीप निलपत्रेवार, परसराम गायकवाड, हुसेन पठाण, कैलास केंद्रे, मोहम्मद इम्रान ने. स्था. गु.शा. व सायबर चे गणेश कौटकर, राजेश आगाशे यांनी मिळून केली.

Leave A Reply

Your email address will not be published.