Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
गोंदिया येथील प्रॅापर्टी डिलर महेश दखणे खुन प्रकरणाचा उलगडा करण्यात गोंदीया पोलिसांना यश, काही तासाचे आत आरोपींना केले गजाआड….
स्थानिक गुन्हे शाखा आणि गोदिया शहर पोलिसांची संयुक्त कामगिरी…
गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत असे की,रविवार दि.(9) जुन रोजी सकाळी 09.15 वाजता चे सुमारास प्रॅापर्टी डिलर महेश विजयकुमार दखने, वय 36 वर्षे, रा. छोटा गोंदिया हा कामानिमित चौकात गेला असतांना,किसान चौक, छोटा गोंदिया बायपास रोडचे बाजूला अज्ञाताने महेश दखने यास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर वार करुन गंभीर जखमी केले होते यावरुन महेश याची पत्नी फिर्यादी कामीनी महेश दखने वय 34 वर्ष रा. छोटा गोंदिया यांचे तक्रारीवरून पो.स्टे. गोंदिया शहर येथे अप 365/2024 कलम 307, 34 भादंवि अन्वये दिनांक 09-06-2024 रोजी गुन्हा दाखल कारण्यात आलेला होता परंतु महेश दखने गंभीर जखमी असल्याने त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याने गुन्ह्यात कलम 302 भा.दं.वि. अन्वये वाढ करण्यात आली आहे..
सदर खून प्रकरण गुन्हयाचे गांभीर्य ओळखून पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, प्रभारी पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांचे आदेशाने उपविभागीय पोलिस अधिकारी, गोंदिया, रोहिणी बानकर यांचे मार्गदर्शनाखाली गोंदिया शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी पोलिस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे,यांचे नेतृत्वात खून प्रकरणातील अज्ञात आरोपींचा शोध घेऊन खून करणाऱ्यांना गुन्ह्यांत तात्काळ जेरबंद करण्याकरीता तसेच खून प्रकरणाचा उलगडा करण्याकरीता विविध पथके नेमण्यात आलेली होती तसेच गोपनीय माहितगार नेमण्यात आले होते
अज्ञात आरोपींचा शोध करीत असताना घटनास्थळावरून प्राप्त माहीती व गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ४ संशयितांनी ताब्यात घेऊन प्राथमिक चौकशी केली असता सदरचा खुन त्यांनी केल्याचे निष्पन्न झाले यातील खून करणारे गुन्हेगार आरोपी 1) देवेंद्र उर्फ देमा तुकाराम कापसे वय 48 वर्ष रा. शिव मंदीर, आंबाटोली फुलचुर गोंदिया 2) सुरेंद्र हरीदास मटाले बय 32 वर्ष रा.शिवणी इंदिरानगर पो.चिरचाळबांध ता.आमगांव जि.गोंदिया 3) मोरेश्वर चेतराम मटाले वय 26 वर्ष रा. मोहगांव, पो. सुपलीपार, ता. आमगांव, जि. गोंदिया 4) नरेश नारायण तरोणे वय 38 वर्ष रा.आर.टी. ओ.ऑफीस जवळ, गोंदिया यांना ताब्यात घेण्यात आले
नमूद चारही आरोपींना गुन्ह्याचे अनुषंगाने विश्वासात घेवुन तपासा दरम्यान विचारपूस चौकशी केली असता प्राथमिकदृष्ट्या तपासात यातील अरोपींनी यातील मृतक महेश दखने यास आर्थिक कारणावरून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याचे डोक्यावर हातोडीने वार करून गंभीर जखमी केल्याचे निष्पन्न झाले आहे नमूद चारही आरोपींना गुन्ह्यांत अटक करण्यात आली असुन चारही आरोपींना मा. न्यायालया समक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने दिनांक 15 जुन पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर केलेला आहे.
प्राथमिकदृष्टया तपासात यातील आरोपी क्र.1) देवेंद्र कापसे हा मुख्य सुत्रदार दिसून येत आहे तसेच यातील आरोपी क्र. 1 ते 4 हे गुन्हेगार प्रवृत्तीचे असून आरोपी क्र.1 देवेंद्र कापसे यांचेवर गोंदिया ग्रामीण पोलिस ठाणे येथे 3 गुन्हे, आरोपी क्र. 3 मोरेश्वर मटाले यांचेवर पोलिस ठाणे गोंदिया शहर, व ग्रामीण येथे 2 गुन्हे, तर आरोपी क्र. 4 नरेश तरोने यांचेवर खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे, शस्त्र अधिनियम अश्या विविध प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद आहे
सदरची कामगिरी ही पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे,अपर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा,उपविभागीय पोलिस अधिकारी गोंदिया रोहिणी बानकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी, पोलिस ठाणे गोंदिया शहर,स्था.गु.शा.चे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, यांचे नेतृत्वातील पथकातील स.पो.नि. सोमनाथ कदम, स.पो. नि. संजय पांढरे, पोउपनि मंगेश वानखडे, पोउपनि सैदाने, पोउपनि चण्णावार, पोउपनि थेर, पो.हवा. कवलपालसिंग भाटीया, जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, निशिकांत लोदासे, दिपक रहांगडाले, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, म.पो. हवा. रिना चव्हान,पोशि दिनेश बिसेन, मुकेश रावते, सुभाष सोनवाने, कुणाल बारेवार, पोहवा शामकुमार कोरे संतोष भेडारकर तसेच स्था.गु.शा. पथक पो.हवा. राजु मिश्रा,महेश मेहर, कोडापे, सोमु तुरकर, भुवन देशमुख, लक्ष्मण बंजार अजय रहांगडाले, विनोद गौतम यांनी केलेली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि. मंगेश वानखडे, पो.स्टे. गोंदिया शहर हे करीत आहे