Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मोटारसायकल चोरट्याला भडगाव पोलिसांनी केली अटक…

20


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

मोटारसायकल चोरट्याला भडगाव पोलिसांनी केली अटक…

जळगाव (प्रतिनिधी) – भडगाव पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर मोटार सायकल चोरट्यांना शिताफीने अटक करून त्यांच्याकडून ३ मोटारसायकल ह्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी फिर्यादी – सुनिल शिवाजी गंजे (वय-४१ वर्षे), धंदा-शेती, रा.गिरणा कॉलनी भडगाव जि.जळगाव यांचे फिर्यादीवरुन रजिस्टर नं.१९४/२०२४ भादवी. कलम ३७९ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, (दि.०६जुन) रोजी सांयकाळी १६.३० वा.सु. भडगाव ते पाचोरा रोडवरील वर्धमान मॉलचे समोर समर्पण हॉस्पीटल च्या गल्लीने वेलजी भाई सॉ मीलवाले यांचे घरासमोरुन फिर्यादी यांचे मालकीची ५०,०००/- रु.कि.ची काळ्या ग्रे रंगाची होंडा कंपनीची शाईन मोटार सायकल गाडी क्रं. MH- १९-DF-४६३८ जु.वा.कि.अं. हि कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे संमतीवाचुन लबाडीचे इराद्याने चोरुन नेली वैगेरे अशा दिलेल्या फिर्याद वरुन भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नं. १९४/२०२४ भादवी. कलम ३७९ प्रमाणे फिर्यादी सुनिल शिवाजी गंजे (वय-४१ वर्षे), धंदा-शेती रा.गिरणा कॉलनी भडगाव जि.जळगाव यांचे फिर्याद वरुन अज्ञात आरोपी विरुध्द दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे तपास हा पो.हे.काँ. किरण पाटील यांचे कडे देण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास हा पोलीस अधिक्षक माहेश्वर रेड्डी, जळगाव, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर चाळीसगाव परिमंडळ, सहायक पोलीस अधिक्षक अभियसिह देशमुख, चाळीसगांव भाग यांचे सुचना व मार्गदर्शना नुसार सदर गुन्ह्याचा तपासात सी.सी.टी.व्ही फुटेज च्या आधारे गोपनीय माहिती काढुन चोरीस गेलेल्या मोटर सायकल ही भडगाव शहरातील १)अमोल तुकाराम पाटील (वय २८) रा.भडगाव पेठ, भडगाव, ह.मु. आदर्शनगर, चाळीसगांव रोड, भडगाव २) अमोल भागचंद परदेशी (वय-३५) रा.आझाद चौक, भडगाव ह.मु.भोसले पार्क, कोठली रोड, भडगाव यांनी चोरी केल्याची माहिती मिळाल्याने त्यांना गुन्ह्याचे तपासकामी ताब्यात घेवुन (दि.०७जुन) रोजी १९.१६ वाजता अटक करण्यात येवुन दोघे आरोपी हे पोलीस कस्टडी मध्ये असताना आरोपीतांकडे विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्ह्यात चोरी केलेली मोटर सायकल ही चोरी केल्याची कबुली देऊन तसेच अटकेत असताना इतर ठिकाणावरुन अजुन दोन मोटर सायकली अशा तीन मोटर सायकल चोरी केल्याची पोलीस कस्टडी मध्ये कबुली दिल्याने सदरच्या मोटर सायकली गुन्ह्यात आरोपीने कबुली दिल्याने त्या जप्त करण्यात आलेल्या आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक माहेश्वर रेड्डी जळगाव, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, चाळीसगाव परिमंडळ, सहायक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख चाळीसगाव भाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोउनि. शेखर डोमाळे, पोहेकाँ. किरण रविंद्र पाटील, पोहेका निलेश भालचंद्र ब्राम्हणकर, पोकाँ. सुनिल जयसिंग राजपुत, पोकाँ. प्रविण परदेशी, पोकॉ. संभाजी पाटील यांनी केली असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकाँ किरण रविंद्र पाटील हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.