Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Mysterious Temples : भारतातील ५ सर्वात रहस्यमयी मंदिरांविषयी तुम्हाला माहित आहे का? घडतो या ठिकाणी चमत्कार

11

Mysterious Temples In India :

भारतात अशी अनेक रहस्यमय मंदिरे आहेत, ज्यांचा इतिहास हजारो वर्षांपासून आजही कार्यरत आहे. भारत हे अध्यात्माचे केंद्र मानले जाते. येथे अनेक प्राचीन मंदिर आहेत. ज्यांची वेगवेगळी रहस्य आपल्याला पाहायला मिळतात.

हिंदू धर्मात देवी – देवतांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतात काही मंदिरे असे आहे की, या ठिकाणी अनेकांना चमत्कार घडताना पाहिला आहे. असे म्हटले जाते की, या मंदिराचे दर्शनाने सर्व दु:ख दूर होतात. तसेच जीवनात सुख शांती येते.

भारतातील या मंदिरांमध्ये चमत्कार पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. अशाच काही भारतातील ५ जगप्रसिद्ध रहस्यमय मंदिरांबद्दल सांगणार आहोत ज्या ठिकाणी तुम्हाला जाण्याची इच्छा होईल

1. ज्वाला देवी मंदिर- कांगडा व्हॅली, हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशातील कांगडा खोऱ्याच्या दक्षिणेस ३० किलोमीटरच्या अंतरावर ज्वाला देवीचे मंदिर आहे. हे मंदिर भारतातील रहस्यमय मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराला सती देवीच्या ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे असे म्हटले जाते. असे म्हटले जाते की, सती देवीच्या शरीराचा अंग या ठिकाणी पडला होता. या मंदिराचा शोध महाभारतात पांडवांनी लावला होता. या मंदिराचा रहस्यमय गोष्ट म्हणजे मंदिरात हजारो वर्षांपासून मातेच्या मुखातून आग निघते. तसेच या मंदिरात वेगवेगळ्या ठिकाणांहून अग्नीच्या नऊ ज्वाला निघतात. ज्या नऊ देवीचे रुप मानले जातात.

2. वीरभद्र मंदिर- लेपाक्षी, अनंतपूर, आंध्र प्रदेश

भारतातील रहस्यमय मंदिरांपैकी एक असलेल वीरभद्र मंदिर. हे मंदिर आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील लेपाक्षी या छोट्या गावात आहे. त्यामुळे या मंदिराला लेपाक्षी मंदिर असे म्हटले जाते. या मंदिरात एकूण ७२ खांब आहेत. त्यातला एक खांब छताला स्पर्श करत असून तो जमिनीपासून उंचावलेला आहे. त्यामुळे या खांबाला हँगिंग पिलर असे म्हणतात. या मंदिरात येणारे पर्यटक खांबाच्या एका बाजूने रुमाल किंवा कापड लावून जमिनीवरुन उभारलेल्या स्तंभाची तपासणी करतात. हे मंदिर विजय नगर शैलीत बांधण्यात आले आहे.

3. श्रीकाल भैरव मंदिर, उज्जैन

उज्जैनच्या कालभैरव मंदिराच्या अनेक घटना भाविकांना थक्क करतात. उज्जैन हे आकाश आणि पृथ्वीचे केंद्र मानले जाते. हे भारतातील एकमेव मंदिर असे आहे की भक्त काल भैरवाला मद्य अर्पण करतात. या मंदिराच्या वाटेत अनेक मद्यपानाची दुकाने आहेत. तसेच हे मद्य अर्पण केल्यानंतर कुठे जाते हे आजपर्यंत कळालेले नाही. या ठिकाणी राजा किंवा राजघराण्यातील लोक रात्री राहू शकत नाही. भगवान शिव हे उज्जैनचे एकमेव राजा मानले जातात.

4. स्तंभेश्वर महादेव मंदिर, गुजरात

भारतातील रहस्यमय मंदिरांपैकी एक असणारे स्तंभेश्वर महादेवाचे मंदिर. गुजरात राज्याची राजधानी गांधीनगरपासून सुमारे १७५ किलोमीटर अंतरावर जंबुसरच्या कवी कंबोई गावात हे मंदिर आहे. हे मंदिर १५० वर्ष जुने असून अरबी समुद्र आणि खंभातच्या आखाताने वेढलेले आहे. हे मंदिर दोनदाच भाविकांसाठी खुले होते. हायटाईडच्या वेळी हे मंदिर पाण्यात बुडते. या दरम्यान मंदिराचा एकही भाग दिसत नाही. पाणी ओसरल्यानंतर हे मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले करण्यात येते.

5. असिरगड शिव मंदिर, मध्य प्रदेश

अरिसरगड किल्ल्यात असलेले मंदिर आणि शिवलिंग महाभारत काळात बांधले गेले आहे. हे मंदिर मध्य प्रदेशातील बुरहानपूर शहरापासून २० किलोमीटर अंतरावर असिरगड किल्ल्यामध्ये आहे. या मंदिराची पूजा करणारा अश्वधामा हा पहिला माणूस असल्याचे सांगितले जाते. अश्वत्मा हा पांडव आणि कौरवांचे गुरू द्रोणाचार्य यांचा मुलगा होता, ज्याला भगवान कृष्णाने युगानुयुगे भटकण्याचा शाप दिला होता. या मंदिराचा दरवाजा उघडल्यानंतर शिवलिंगावर फुले आणि चंदन पाहायला मिळते.

टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.