Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
घरफोडीतील पाहीजे असलेल्या आरोपीस गुन्हे शाखा युनीट २ ने शिताफीने घेतले ताब्यात…
अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि.(२९) एप्रिल २०२४ रोजी तक्रारदार प्रविण बनकर रा. खंडेलवाल नगर अमरावती यांनी पो.स्टे. बडनेरा येथे तक्रार दिली होती की, ते नातेवाईकांच्या घरी बाहेरगावी गेले होते तेथून घरी परत आले
असता त्यांचे घराचे लोंखडी गेटचे कुलूप तुटलेले दिसले तसेच हॉलच्या मुख्य दाराची कडी वाकलेली दिसून आली त्यांनी घरातील रूमचे कपाटाची पाहणी केली असता सामान अस्तव्यस्त दिसून आले व एकूण ७७,५००/- रू चे सोन्याचे दागीने कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेले. अशा फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन बडनेरा येथे अप. क्र. २९९/२०२४ कलम ४५४, ४५७, ३८० भादवि प्रमाणे अज्ञात आरोपींविरूध्द गुन्हा दाखल असुन तपास सुरु होता परंतु गुन्हे शाखा युनिट २ चे पथकाने सदर चा गुन्हा उघडकिस आणून सदर गुन्हयातील चार आरोपी निष्पन्न करून त्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. इतर आरोपी हे फरार होते.
याच्याअनुषंगाने पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांचे निर्देशान्वये आयुक्तालय हद्दीत घरफोडी चे गुन्हयांना आळा बसावा आणि गुन्हे उघडकीस यावे त्याकरीता निर्देशान्वये गुन्हेशाखा पोलिस निरीक्षक राहुल आठवले यांचे आदेशाने युनिट. २ येथील पथकातील अधिकारी व अंमलदार या गुन्हयातील फरार आरोपीबाबत गुप्त बातमीदार नेमुन गुन्हयाचा समातंर तपास करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, सदर गुन्हयातील फरार आरोपी साहील कैलास राउत वय २२ वर्ष रा. रा. गांधी आश्रम सरकारी संडास जवळ अमरावती हा पार्वती नगर परिसरात फिरत आहे. यावरून गुन्हे शाखा युनिट २ यांच्या पथकाने सापळा
रचुन त्यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेवुन त्यास पुढील कार्यवाही करीता पोलिस स्टेशन बडनेरा येथे देण्यात आले आहे. सदर गुन्हया व्यतीरीक्त तपासा मध्ये नमुद आरोपीकडुन अजुन काही गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांचे
मार्गदर्शनाखाली, पोलिस उपायुक्त कल्पना बारावकर, पोलिस उपायुक्त सागर पाटील, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे ,सहायक पोलिस आयुक्त गुन्हेशाखा, शिवाजी बचाटे पोनि राहुल आठवले गुन्हे शाखा यांचे नेतृत्वाखाली सपोनि महेश इंगाले, सत्यवान भुयारकर, पोउपनि संजय वानखडे, पोलिस अंमलदार राजेंद्र काळे,
जावेद अहमद, दिपक सुंदरकर, गजानन ढेवले, मंगेश शिंदे, संग्राम भोजने, नईम बेग, चेतन कराडे,योगेश पवार, चंद्रशेखर रामटेके, नईम बेग, निलेश वंजारी, सागर ठाकरे राजीक रायलीवाले, संदीप
खंडारे यांनी केली आहे.