Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने MD पावडरसह तिघांना घेतले ताब्यात,७ लक्ष रु चे MD पावडर केले जप्त….

19


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

अंमली पदार्थ एम.डी. पावडर बाळगणाऱ्या ०३ आरोपींना ताब्यात घेऊन एकुन ८,४५,१००/- रू. चा मुद्देमाल केला जप्त,गुन्हेशाखा, सामाजिक सुरक्षा  पथकाची कामगिरी…

नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि(१८) चे संध्याकाळी चे  दरम्यान, गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभाग पथकाचे अधिकारी व अंमलदार हे गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना गोपनीय सुत्राकडुन माहीती मिळाली की  पोलिस ठाणे हुडकेश्वर हद्दीत, प्लॉट नं. १२४, पवनपुत्र नगर, उमरेड रोड, बहादुरा फाटा, नागपूर येथे काही ईसम अॅक्टीव्हा गाडीवर फिरत असुन त्यांचेजवळ अंमली पदार्थ  एम.डी. पावडर बाळगुन आहेत.

अशा मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून सापळा रचुन ग्रे रंगाची अॅक्टीव्हा मोपेड क. एम.एच. ३१ एफ.व्ही. ८४२७ या गाडीवरील तिन ईसमांना थांबवुन पंचासमक्ष छापा कार्यवाही केली असता, आरोपी १ )रोहन सुरेश ढाकुलकर, वय २८ वर्षे २) शुभम सुरेश ढाकुलकर, वय ३१ वर्षे, दोन्हीही रा. पवनपुत्र नगर, उमरेड रोड,नागपुर ३) वेदांत विकास ढाकुलकर, वय २४ वर्षे, रा. घर नं. ६६, नेताजी मार्केट, जानकी टॉकीज मागे, धंतोली, नागपुर यांची व वाहनाची झडती घेतली असता, गाडीचे डिक्कीमध्ये ७१ ग्रॅम ११ मि. ग्रॅम एम. डी. पावडर किंमती ७,११,१००/-रू. ची मिळुन आली.

तसेच आरोपीचे ताब्यातुन एम.डी. पावडर, चार मोबाईल फोन, एक अॅक्टीव्हा मोपोड,वजन काटा व रोख २२,५०० /- रू. असा एकुण ८,४५,१०० /- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी हे
त्यांचा साथीदार व पाहीजे असलेला आरोपी  तबरेज आलम उर्फ टिपु वल्द अफरोज आलम, रा. नागपुर याचे मदतीने अवैध अंमली पदार्थ खरेदी, विक्री करीत असल्याचे सांगीतले.यावरुन तिन्ही आरेपीविरुध्द कलम ८ (क), २२ (क) २९ एन.डी.पी.एस.
अॅक्ट नुसार होत असल्याने, आरोपींविरूध्द पोलिस ठाणे हुडकेश्वर येथे गुन्हा नोंदविण्यात आला असुन. तिन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाईस्तव हुडकेश्वर पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे व पाहीजे असलेला आरोपीचा शोध सुरू आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्रकुमार सिंघल,सह पोलिस आयुक्त अस्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त (गुन्हे)संजय पाटील,पोलिस उप आयुक्त (डिटेक्शन)निमीत गोयल,सहा. पोलिस आयुक्त (गुन्हे)डॅा अभिजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाच्या मपोनि. कविता ईसारकर, पोहवा. सचिन बढीये, लक्ष्मण चौरे, नापोशि अजय पौनिकर, शेषराव राऊत, अश्विन मांगे, पोशि कुणाल मसराम, समिर शेख, प्रकाश माथनकर, नितीन वासने व मपोअं. पुनम शेंडे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.