Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
अवैध रेतीची चोरटी वाहतुक करणारे गुन्हे शाखेच्या ताब्यात…
पारशिवनी(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि (२५)जुन चे रात्री दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा नाग्रा येथील स्टाफ पो.स्टे. पारशिवनी हद्दीत अवैध रेती संबंधाने पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय खात्रीशीर माहिती मिळाली की, मौजा डोली येथे ट्रक द्वारे अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतुक होत आहे.
अशा मिळालेल्या माहिती वरून घटनास्थळी नाकाबंदी केली असता दोन ट्रक विनापरवाना अवैध रेती वाहतुक करताना मिळुन आले. त्यात टाटा कंपनीचा १० चक्का ट्रक क्र एम एच ४० बी जी ७००६ चा चालक व मालक आरोपी क्र. १) अनवर मुबारक हुसेन, वय ३७ वर्ष रा. कांजी हाउस इंदीरानगर नागपुर हा आपले ताब्यातील ट्रकमध्ये अवैध्यरित्या विनापरवाना डोरली शिवारातील नदीच्या
पात्रातुन रेतीची चोरटी वाहतुक करताना मिळुन आला. स्टाफने आरोपी क्र. १) चे ताब्यातील ट्रक क एम एच ४० बी जी ७००६ कि २००००००/- रू. ज्यामध्ये अंदाजे ४ ब्रास रेती प्रत्येकी ५०००/- रू प्रमाणे एकुण २०००० रू. एकुण २०,२०,०००/- रू. चा मुद्देमाल तसेच समोरून येणारे अशोक ले लॅन्ड कंपनीचा १० चक्का ट्रक क्र एम एच ४० ए के ७३४५ चा चालक आरोपी क्र. २) दिलीप काशीनाथ निपाने वय ३७ रा वार्ड क्र ४ बिनासंगम याने आपले
ताब्यातील ट्रक पोलिसांना पाहुन रीवर्स घेवुन आपला ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवित असताना पथकाने त्याचा पाठलाग केला असता सदर ट्रक चालकाचा ट्रक वरील ताबा सुटल्याने त्याने आपला ट्रक मौजा गरंडा फाटा जवळील नाल्यात टाकुन अपघात केला. नमुद आरोपी याने सुध्दा आपल्या ताब्यातील ट्रक मध्ये आरोपी क्र. ३) पाहीजे आरोपी गाडी मालक विरेंद्र प्रमेलाल ठाकरे, रा. वार्ड क्र. ४ बिनासंगम ता. सावनेर याचे सांगणेवरून अवैध्यरित्या बिनापरवाना डोरली शिवारातील नदीच्या पात्रातुन रेतीची चोरटी वाहतुक करून मिळुन आल्याने आरोपीचा ताब्यातुन अशोक ले लॅन्ड कंपनीचा ट्रक क एम एच ४० ए के ७३४५ कि २००००००/- रू चा ज्या मध्ये अंदाजे ४ ब्रास रेती प्रत्येकी ५०००/- रू प्रमाणे एकुण २००००/- रू असा एकुण दोन्ही वाहनासह ४०४०००० /- रू चा माल जप्त केला
सदर आरोपी विरूध्द पोस्टे पारशिवनी येथे कलम ३७९, २७९, १०९, ३४ भा. द. वी. सहकलम १८४ मोवाका सहकलम ४८ (७), ४८ (८) महा. ज. म. स. सहकलम ४, २१ खान खनिजे अधि. अन्वये पो. स्टे. पारशिवनी येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. यातील
आरोपी क्र १)अनवर मुबारक हुसेन व आरोपी क्र २)दिलीप काशीनाथ निपाने यांना अटक करण्यात आली आहे
सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा . येथील पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, किशोर शेरकी, पोहवा राजू रेवतकर किशोर वानखेडे यांनी केलेली आहे.