Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

हिंगोली पोलिसांनी उघड केला दागीने चोरीचा गुन्हा…

9


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

बाळापुर पोलिस स्टेशन हद्दीतील डोंगरकडा येथील ज्वेलरचे दुकान फोडुन दागीने चोरीचा गुन्हा केला उघड,एकुन ४५९ ग्रॅम वजनाचे दागीने  केले जप्त,पोलिस स्टेशन बाळापुर व स्थानिक गुन्हे शाखा यांची संयुक्त कार्यवाही….

बाळापुर(हिंगोली)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
हिंगोली जिल्हयातील कळमनुरी तालुका अंतर्गत मौ. डोंगरकडा येथे दि (२३) चे रात्री दरम्याण फिर्यादी सोमेश रोडे यांचे ज्वेलरी दुकानाचे शटर वाकवुन दुकानात प्रवेश करून ४५९ ग्रॅम चांदीचे दागीने किं. ४०,६२१ रू चा मुददेमाल चोरून नेला होता. सदर प्रकरणी फिर्यादी यांचे तकारी वरून पो.स्टे. बाळापुर येथे गुरनं.
३६४/२०२४ कलम ४६१,३८० भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता

नमुद गुन्हा तात्काळ उघड करून त्यातील आरोपी अटक करणे बाबत पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांनी दिलेल्या सुचनेनुसार पोलिस निरीक्षक स्थागुशा  विकास पाटील यांचे मार्गदर्शनात पोस्टे. बाळापुर ये प्रभारी अधिकारी सपोनि सुनिल गोपीनवार आणि त्यांचे पथक तसेच स्थागुशा चे सपोनि राजेश मलपिलु आणि त्यांचे पथक यांनी घटनास्थळी भेट देवुन तपासाची चक्रे गतीमान करून व गोपनीय बातमीदाराचे मदतीने तपास करत असतांनाच दिनांक-
२५/०६/२०२४ रोजी रात्री दरम्यान नमुद परीसरात दरोडयाच्या तयारीत असणा-या ०६ इसमांच्या टोळीचा पाठलाग करून त्यातील तिन इसमांना ताब्यात घेतले होते.

त्यात राजु गणेश पवार रा. इंदीरा नगर कळमनुरी व इतर ०२ इसम
हे अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त बालक होते. पो.स्टे. बाळापुर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमुद आरोपींकडे कौशल्यपूर्ण व कसून चौकशी व तपास करता नमुद आरोपींनी दि(२३) रोजी डोंगरकडा येथील ज्वेलरीचे शटर फोडुन चांदीचे दागीने चोरून नेले बाबत कबुली दिली.त्यनुसार आरोपी  राजु गणेश पवार रा. इंदीरा नगर कळमनुरी यांचे ताब्यातुन तपास पथकाने गुन्हयातील चोरीला गेलेले खालील वर्णनाचे चांदीचे ब्रासलेट, चांदीचे चैन, चांदीचे मुकुट असे ४५९ ग्रॅम वजनी चांदीचे संपुर्ण मुददेमाल किंमत  ४०,६२१/- रू. चा मुददेमाल जप्त केला आहे.नमुद आरोपींनी विचारपुस दरम्यान पो.स्टे.पुर्णा जिल्हा परभणी हद्दीतही घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

सदरची कामगिरी.पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधिक्षक  अर्चना पाटील, स्थागुशा पोलिस निरीक्षक विकास पाटील यांचे मार्गदशनाखाली सपोनि सुनिल गोपीनवार, सपोनि राजेश मलपिलु, पोउपनि बालाजी गोणारकर, पोउपनि शिवाजी बोंडले, सफौ नागरे, पोलीस अंमलदार नागोराव बाभळे, रामदास ग्यादलवाड, शेख बाबर, गजानन पोकळे, प्रभाकर भोम, विजय जाधव, शेख अन्सार, बेले, विठठल काळे, गणेश लेकुळे, ज्ञानेश्वर
पायघन, शिवाजी पवार, हरी चव्हाण, सर्व पोस्टे बाळापुर व स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.