Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बनावट नंबर प्लेट लावुन रेतीची चोरटी वाहतुक करणारे भिवापुर पोलिसांचे ताब्यात…

9


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

वाहनाचे नंबर प्लेट बदलवुन अवैध रेती चोरी करणाऱ्यांना भिवापुर पोलिसांनी घेतले ताब्यात,फसवनुकीसह चोरीचा गुन्हा दाखल….

भिवापुर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दिनांक २९/०६/२०२४ चे रात्री ८.००.चे दरम्यान पोलिस स्टेशन भिवापूर येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय खबर मिळाली की, पोस्टे भिवापूर हद्दीतील मौजा जावराबोडी शिवार येथे अवैधरीत्या विनापरवाना रेतीची टिप्पर व्दारे चोरटी वाहतुक होत आहे.

अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून मौजा जावराबोडी येथे पोलिस स्टाफसह  नाकाबंदी करून टिप्पर क्र. एम एच ४० / बीएल ६१०१
चा चालक लोकेश दयाराम देशमुख वय २५ वर्ष २. क्लिनर विकांत चकधारी बुकावन वय २४ वर्ष दोन्ही रा सिंधपुरी तह पवनी जि भंडारा याने आपल्या वाहनात ०६ ब्रास रेती मालक ३) वासुदेव
रमेश बुकावन वय ३६ वर्ष रा बायपास रोड उमरेड जि नागपूर याचे सांगणे वरून आरोपींनी संगणमत करून आपले टिप्पर १) टिप्पर क्र. एम एच ४० / बीएल ६१०१ला दुस-या क्रमांकाची नंबर प्लेट लावुन फसवणुक करून बनावटी परवाना तयार करून दुस-या टिप्परच्या क्रमांकाची रॉयल्टी ठेवुन अवैधरित्या विनापरवाना टिप्परमध्ये आपले आर्थिक फायद्याकरीता शासनाचा महसुल बुडवुन रेती  भरून मालमत्तेचे नुकसान करून रेतीची चोरटी वाहतुक करतांना मिळुन आल्याने नमुद टिप्परमध्ये  ६ ब्रास रेती कि. ३०,०००/- रू. तसेच टिप्पर क्र. एम एच ४०बीएल ६१०१ किंमती २०,००,०००/- रू असा एकूण २०,३०,००० /- रू. चा मुद्देमाल
जप्त करण्यात आलेला आहे.

सदर प्रकरणी पो.स्टे. भिवापूर येथे आरोपीतांविरूद्ध कलम ३७९, ४२०, ४६८,१०९, ३४ भा. द. वी. सहकलम ४८ (७)४८ (८) महाराष्ट्र जमिन महसूल संहिता, सहकलम २१,०४ खाणी आणि खनिजे अधिनियम १९५७ सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधि. १९८४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
पुढील तपास पोहवा प्रफुल माहुरे हे करीत आहे.

सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलिस
अधिक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे भिवापूर येथील ठाणेदार सपोनि जयप्रकाश निर्मल व त्यांचे स्टाफनी पार पाडली,

Leave A Reply

Your email address will not be published.