Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबई,दि.०२:- विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते तथा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्याबाबत विधिमंडळात अपशब्द वापरले.
दानवे यांच्या याच शिवराळ भाषेवर आज प्रसाद लाड चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी अंबादास दानवे यांच्या निलंबनाची तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे ते आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकटेच आंदोलन करत होते. लाड यांच्या या भूमिकेनंतर आजचे विधिमंडळातील कामकाज वादळी ठरण्याची शक्यता आहे.