Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Honor magicbook 2024: लोकप्रिय ब्रँडने आणला नवीन लाइटवेट आणि टचस्क्रीन लॅपटॉप 32 जीबी रॅमसह मिळतील हे दमदार फिचर्स, किंमत जाणून घ्या

10

Honor magicbook 2024: ऑनरने आपल्या इव्हेंटमध्ये नवीन लॅपटॉप म्हणून Honor MagicBook Art 14 2024 लाँच केला आहे. मोबाईल तसेच इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेससाठी ही एक लोकप्रिय कंपनी आहे. या नवीन लॅपटॉपची किंमत आणि स्पेसिफेक्शन्स जाणून घेऊया..

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
ऑनरने आपल्या इव्हेंटमध्ये नवीन लॅपटॉप म्हणून Honor MagicBook Art 14 2024 लाँच केला आहे. हा लेटेस्ट लॅपटॉप विंडोज 11 होम चायनीज एडिशनवर चालतो आणि यात 14.6 इंचाची OLED स्क्रीन आहे. हा लॅपटॉप इंटेल कोर अल्ट्रा 5 किंवा कोर अल्ट्रा 7 सीपीयूवर चालतो, आणि यात 32GB पर्यंत रॅम आहे. कंपनीच्या मते, ऑनरने मॅजिकबुक आर्ट 14 2024 ला 60Wh बॅटरीने सुसज्ज केले आहे जी 30 मिनिटांत 46 टक्के पर्यंत चार्ज होऊ शकते. इव्हेंटमध्ये कंपनीने लॅपटॉपसह Honor Magic V3, Magic Vs 3, MagicPad 2 आणि Honor Pad 9 Pro देखील लाँच केले आहे. चला, नवीन लॅपटॉपची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊया…

वेगवेगळ्या व्हेरिएंटची किंमत

ऑनर मॅजिकबुक आर्ट 14 2024 ची किंमत CNY 7,799 (सुमारे 89,800 रुपये) आहे, ही किंमत 16GB रॅम आणि कोर अल्ट्रा 5 सीपीयू असलेल्या बेस मॉडेलसाठी आहे. 32GB रॅम असलेल्या कोर अल्ट्रा 5 मॉडेलची किंमत CNY 8,499 (सुमारे 97,900 रुपये) आहे. कोर अल्ट्रा 7 सीपीयू आणि 32GB रॅम असलेल्या टॉप-एंड मॉडेलची किंमत CNY 9,499 (सुमारे 1,09,400 रुपये) आहे.

MagicBook Art 14 2024 चे स्पेसिफिकेशन्स

नवीन लॅपटॉपमध्ये 14.6 इंचाचा अल्ट्रा-एचडी (3120×2080 पिक्सेल) OLED टच स्क्रीन डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 258ppi पिक्सेल डेनसिटी आणि 700 निट्स पीक ब्राइटनेस आहे. हे DCI कलर गॅमटचे 100 टक्के कव्हरेज प्रदान करते. लॅपटॉप इंटेल आर्क ग्राफिक्ससह इंटेल कोर अल्ट्रा 7 155H चिपसेटने सुसज्ज आहे, ज्याला 32GB पर्यंत LPDDR5X रॅमसह जोडले गेले आहे.

ऑनरने मॅजिकबुक आर्ट 14 2024 लॅपटॉपला 1TB एसएसडी स्टोरेजसह सुसज्ज केले आहे. यामध्ये उपलब्ध कनेक्टिव्हिटी ऑप्शनमध्ये वाय-फाय 6 आणि ब्लूटूथ 5.3 यांचा समावेश आहे. लॅपटॉपमध्ये एक यूएसबी टाइप-सी पोर्ट, एक यूएसबी 3.2 टाइप-ए पोर्ट, एक थंडरबोल्ट 4 पोर्ट, एक एचडीएमआय 2.1 पोर्ट आणि एक 3.5 एमएम कॉम्बो ऑडिओ पोर्ट आहे.

लॅपटॉपमध्ये NFC कनेक्टिव्हिटी देखील आहे आणि बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी फिंगरप्रिंट सेंसर आहे. कंपनीच्या मते, लॅपटॉपमध्ये 60Wh लिथियम पॉलीमर बॅटरी आहे, जी 30 मिनिटांत 46 टक्के चार्ज होऊ शकते आणि पूर्ण चार्ज होण्यासाठी 95 मिनिटे लागतात. लॅपटॉपचे डायमेंशन 316.77×223.63×12.95 मिमी आणि वजन 1.03 किलोग्रॅम आहे.

गौरव कुलकर्णी

लेखकाबद्दलगौरव कुलकर्णीगौरव कुलकर्णी महाराष्ट्र टाईम्स येथे कन्सल्टंट डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. २ वर्षांपासून डिजिटल मीडियाच्या माध्यमातून अनेक क्षेत्रांविषयी लिहित आहे. त्याने यापूर्वी लाइफस्टाइल व अर्थ विषयात लिखाण केले आहे. Times internet संचलित MENSXP आणि Mahamoney.Com येथे त्याने काम केले आहे. यासोबतच त्याला विज्ञान व टेक्नोलॉजी या विषयात विशेष रस आहे. याव्यरिक्त तो लेखक, कवी आणि दिग्दर्शक देखील आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.