Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

iQOO Z9 Lite 5G: फक्त 10 हजारांत IP64 रेटिंग असलेला वॉटर रेजिस्टंट फोन; 5G सह दमदार फीचर्स

9

IQOO Z9 Lite 5G भारतीय बाजारात लाँच झाला आहे. दहा हजारांच्या आत आलेला हा फोन 50MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी, MediaTek प्रोसेसर, 6GB RAM, 90 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि IP64 वॉटर रेजिस्टन्स रेटिंगसह आला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
स्मार्टफोन ब्रँड आयकूनं भारतात आपला नवीन फोन आयकू झेड 9 लाइट 5जी लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये शानदार फोटो क्लिक करण्यासाठी 50MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. फास्ट प्रोसेसिंगसाठी डिव्हाइसमध्ये MediaTek चा प्रोसेसर मिळतो. तसेच, मोबाइल फोनमध्ये एक्सटेंडेड रॅम आणि 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. बजेट सेगमेंटमध्ये Xiaomi, Realme आणि Oppo सारख्या कंपन्या या हँडसेटला टक्कर देतील.

आयकू झेड9 लाइट 5जी चे स्पेसिफिकेशन्स

स्मार्टफोनमध्ये 6.56 इंचाचा अल्ट्रा ब्राइट डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आणि पीक ब्राइटनेस 840 निट्स आहे. चांगल्या ऑडियोसाठी नवीन मोबाइल फोनमध्ये दमदार स्पिकर सह Dynamic ऑडियो बूस्टर देण्यात आला आहे, जो साउंड 150 टक्क्यांपर्यंत वाढवतो.
CMF Phone 1: हा फोन घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड! फक्त तीन तासांत 1 लाख युनिट्सची विक्री

कंपनीनं आयकू झेड 9 लाइट 5जी मध्ये ड्युअल AI रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात 50MP चा मुख्य कॅमेरा आणि 2MP चा बोकेह सेन्सर आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हँडसेटमध्ये 8MP चा कॅमेरा मिळतो.

मोबाइल फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर, 6GB रॅम आणि व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट मिळतो. याची इंटरनल स्टोरेज 128GB आहे, जी मायक्रो एसडी कार्डच्या मदतीनं 1TB पर्यंत वाढवता येते. अँड्रॉइड 14आधारित फनटच 14 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.

आयकूच्या नवीन स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ आणि यूएसबी टाईप-सी पोर्ट देण्यात आला आहे. यात फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकचा सपोर्ट मिळतो. आयकू झेड9 लाइट 5जी मध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी मिळते. याबाबत दावा करण्यात आला आहे की ही बॅटरी फुल चार्जमध्ये 9 तास गेमिंग, 23 तास बिंज-वॉचिंग, 32 तास सोशल मीडिया आणि 84 तास म्यूजिक प्लेबॅक टाइम देते.

आयकू झेड9 लाइट 5जी ची किंमत

आयकू झेड9 लाइट 5जी 4GB रॅम व 128GB आणि 6GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेलमध्ये सादर केला आहे. याची किंमत अनुक्रमे 9,999 रुपये आणि 10,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनची विक्री अ‍ॅमेझॉन इंडियावर 20 जुलै 2024 पासून सुरु होईल.

सिद्धेश जाधव

लेखकाबद्दलसिद्धेश जाधवसिद्धेश जाधव जवळपास 6 वर्ष डिजिटल मीडियामध्ये टेक्नोलॉजी विषयी लिहीत आहे. सुरुवातीपासूनच टेक विषयी माहिती वाचकांना समजेल अशा सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. कामाव्यतिरिक्त सिद्धेशला प्रवास करायाला आवडतं. नेहमीच तो वेगवेगळ्या गड किल्ल्यांवर आणि ऐतिहासिक ठिकाणी फिरत असतो. फावल्या वेळात त्याला चित्रपट बघायला आवडतात. कधीकधी तो आपल्या भावना आणि विचार चारोळ्यांच्या माध्यमातून व्यक्त करतो…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.