Amol Kolhe Checking by Election Officers After Uddhav Thackeray: ठाकरेंनंतर आता महाविकास आघाडीचे खासदार अमोल कोल्हे यांचीही बॅग तपासण्यात आली आहे. याबद्दल एक्स प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ पोस्ट करत कोल्हेंनी माहिती दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहत सरकारला प्रश्न विचारले आहेत. कोल्हे म्हणाले, ‘आज पुन्हा बॅग तपासली गेली, विधानसभा निवडणुकीदरम्यान दुसऱ्यांदा तपासणी झाली. आजच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचीही तपासणी झाली. नियम असतात हे मान्य आहे, पण नियम फक्त विरोधी पक्षांनाच असतात अन् सत्ताधाऱ्यांना सगळीकडे मोकळं रान असतं हे मान्य नाही. कायदा आहे, तर तो समानच असला पाहिजे!’
विधानसभा निवडणुकीदरम्यान माझ्या बॅगांची दुसऱ्यांदा तपासणी करण्यात आल्याची माहिती अमोल कोल्हेंनी दिली आहे. तर यवतमाळमधील वणी येथे प्रचारसभेसाठी दाखल झालेल्या उद्धव ठाकरेंचे हेलिकॉप्टर लँड होताच त्यांचे हेलिकॉप्टर आणि बॅगांची तपासणी करण्यसाठी निवडणूक अधिकारी पुढे सरसावले. तपासणीवेळी स्वत: उद्धव ठाकरेंनी व्हिडीओ शूट केला. कधी मुख्यमंत्र्यांची बॅग तपासली का, असा सवाल ठाकरेंनी अधिकाऱ्यांना विचारला.
जयंत पाटील काय म्हणाले?
बॅगांच्या तपासणीवर उद्धवजींनी जो उद्वेग व्यक्त केला, त्यानुसार विरोधी पक्षाचे सामान असल्यास तपासण्याची व्यवस्था दिसते. सत्ताधारी पक्षाचे सामान तपासलेले आम्ही कुठे पाहिले नाही. म्हणून त्याबद्दल त्यांनी भूमिका व्यक्त केली. आचारसंहितेमध्ये तपासणी कोणी काय पैशाचं देवाण-घेवाण करता का म्हणून मागच्या निवडणुकीमध्ये हेलिकॉप्टर मधून बॅगांचे पार्सल केले. सत्तेमध्ये बसलेले लोक अधिक हुशार झाले आहेत त्यांनी आधीच सगळ्या मतदारसंघांना आपली भेट पोहोचवलेली आहे,