टायगर ३ च्या बॉक्स ऑफिसबद्दल बोलायचं झालं तर, पहिल्या दिवशी ओपनिंग कमाई ही ४४.५० कोटी झाली होती. तर दुसऱ्या दिवशी सिनेमानं ५९.२५ कोटी कमावले होते. पहिल्या दिवशीपेक्षा ही कमाई ३३.१५ टक्के जास्त होती. तर मंगळवारी सिनेमानं ४४.३ कोटींचा गल्ला जमवला आहे. तर बुधवारी सिनेमानं फक्त २१.१ कोटींची कमाई केली आहे.
दिवसेंदिवस सिनेमाच्या कमाईत झाली घट
गुरुवारी सलमानच्या या सिनेमानं १८ .०५ कोटी कमावले. तर पहिल्या आठवड्याच्या एकूण कमाईचा आकडा हा १८७.६५ कोटी इतका होता. तर या सिनेमाचं बजेट हे ३०० कोटी असल्याचं म्हटलं जात आहे. या सिनेमानं आतापर्यंत २३० कोटींची कमाई केली आहे. त्यामुळं या सिनेमाला बजेटचा आकडाही पार करता आला नाहीये.
दरम्यान सिनेमातल्या कतरिनाच्या भूमिकेबद्दल बोलायचं झालं तर, या सिनेमात तिचा एक नवा लूक प्रेक्षकांना पाहायला मिळाला. त्यामध्ये ती अँक्शन हिरोइन म्हणून दिसतेय. ‘टायगर’च्या याआधीच्या दोन्ही भागांपेक्षा तिसऱ्या भागात कतरिना जबरदस्त स्टंट करताना दिसली आहे. हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये ‘टायगर’चा तिसरा भाग प्रदर्शित झाला आहे. कतरिनानं यातील गुप्तहेराची भूमिका साकारण्यासाठी आणि स्टंट करण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेतलंय. ती म्हणाली, ‘झोया ही माझ्या करिअरमधली खूप महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. मी प्रत्येक चित्रपटात स्वतःची परीक्षा घेतली आहे. ‘टायगर ३’मधील अॅक्शन सिक्वेन्स खूपच वेगळे आणि चित्तथरारक आहेत. सिनेमात अॅक्शन सीन्स करणं हा माझ्यासाठी नेहमीच रोमांचक अनुभव ठरला आहे.’ या चित्रपटात इमरान हाश्मी देखील खलनायकाची भूमिका साकारत आहे. या सगळ्याशिवाय शाहरुख खान आणि हृतिक रोशनचा कॅमिओ आहे.