Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

रामदास आठवलेंना धक्का, निकटवर्तीयाची पक्षाला सोडचिठ्ठी, मनसेचा झेंडा हाती घेत उमेदवारी जाहीर

3

Rajabhau Kapse: शिवसेनेकडून भाऊसाहेब कांबळे हे महायुतीचे उमेदवार आहेत. २००९ ते २०१४ सलग दोन पंचवार्षिक भाऊसाहेब कांबळेंनी श्रीरामपुर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

हायलाइट्स:

  • महायुतीतून पहिला मोठा नेता राज ठाकरेंच्या ताफ्यात
  • रिपाईच्या राजाभाऊ कापसेंचा मनसे प्रवेश
  • कापसे आता किंग होणार की किंगमेकर?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
राजाभाऊ कापसे मनसे उमेदवारी

पियुष पाटील, मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई)चे अध्यक्ष रामदास आठवले हे महाराष्ट्रात महायुतीतील घटक पक्षातील प्रमुख नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे लोकसभा निवडणूक असो की विधानसभा ते कायम आपल्या पक्षासाठी जागांची मागणी करत करतात. असे असले तरी आठवलेंच्या पक्षाला ते वगळता महायुतीकडून काही मिळताना दिसत नाही. आज मनसेने उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली, त्यात आठवलेंचे निकटवर्तीय समजले जाणारे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे राज्य सचिव राजाभाऊ कापसे यांना मनसेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. राजाभाऊ यांनी शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या उपस्थितीत आपल्या कार्यकर्त्यांसह मनसेत प्रवेश केला. आठवले आणि महायुतीसाठी हा मोठा झटका असल्याचे बोलले जात आहे. या पक्षप्रवेशावेळी “मनसेचा भगवा रंग हा बाबासाहेबांना मानणारा आहे”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. ज्या श्रीरामपुर या राखीव मतदारसंघातून कापसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हा मतदार संघ रिपाईला न सुटल्याने कापसेंनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. याआधी कापसेंनी २००९ला रिपाईकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना १९ हजार ६५९ मत घेत चैथ्या क्रमांकावर राहिले. महायुती आणि आघाडीसाठीसुध्दा या मतदारसंघात घमासान पाहायला मिळत आहे. काँग्रेसने विद्यमान आमदार लहू कानडेंचं तिकीट कापत हेमंत ओगले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Jagdish Mulik: माझ्या नेत्याचा मला कॉल; वडगाव शेरीत BJPच्या जगदीश मुळीक यांचा यू-टर्न, देवा भाऊंचा एक फोन अन्…

नाराज झालेल्या लहू कानडेंनी राष्ट्रवादी (अजित पवार) गटात प्रवेश केला आहे. शिवसेनेकडून भाऊसाहेब कांबळे हे महायुतीचे उमेदवार आहेत. २००९ ते २०१४ सलग दोन पंचवार्षिक भाऊसाहेब कांबळेंनी श्रीरामपुर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. लहू कानडेंनी सुध्दा त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावरुन आज उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे घोषित केलं आहे. आता या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. मनसेचे राजाभाऊ किंग होणार की किंगमेकर अशी चर्चा आता मतदारसंघात सुरु आहे. मनसेची मते यात निर्णायक ठरणार आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.