Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मल्याळी येत नसलेल्या एका तडफदार पोलीस अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा त्यानं उत्तम वठवली आहे. ही भूमिका गिरीशनंच साकारावी असं चित्रपटाच्या संपूर्ण टीमला वाटत होतं. चित्रपटाचा पटकथा लेखक श्याम पुष्करणने याआधीही गिरीशबरोबर काम केलं आहे. श्यामने त्याला फोन करून त्याची इच्छा सांगितली. चित्रपटाची कथा ऐकताच गिरीशनेही लगेच होकार कळवला.
‘लॉकडाउनच्या काळात अनेक मल्याळी चित्रपट पाहिले असल्यामुळे आपणसुद्धा त्या भाषेत सिनेमा करावा असं मला वाटत होतं. सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान भाषेच्या संदर्भात अनेक गमतीशीर गोष्टी घडल्या आहेत’, असं तो म्हणाला. या सिनेमाच्या चित्रीकरणाच्या काळात समजू शकेल इतकी मल्याळी भाषा तो शिकला.
चित्रपटाचा दिग्दर्शक सहीद अराफतविषयी गिरीश म्हणाला, ‘माझा एक प्रसंग चित्रित झाल्यानंतर सहीद कौतुक करायचा. नंतर पुढचा प्रसंग तो मला मल्याळीमध्ये शिकवायचा; मग त्याला कळायचं की मला काहीच समजत नाहीय. शेवटी तो कोणाला तरी मला प्रसंग समजवायला सांगायचा.’ तमिळनाडूसारख्या निसर्गरम्य वातावरणात चित्रीकरण करण्याचं सुख आल्हाददायी असल्याचंही त्यानं सांगितलं.
कलाकारानं इतर भाषेत काम करावं आणि वेगवेगळ्या भाषा शिकाव्यात असं मला वाटतं. ‘थंकम’मध्ये मी वेगळ्या भाषेत काही संवाद बोललो आहे. ते संवाद फार मजेशीर आहेत. मल्याळी सिनेसृष्टी आपल्याला वर्ल्ड सिनेमाचा कंटेंट देतेय. मल्याळी सिनेमा आशयघन सिनेमांना वाव देतो आणि त्यात तो व्यावसायिकदृष्ट्यासुद्धा यश मिळवतो. चित्रपटाप्रती असलेलं मल्याळी लोकांचं प्रेम विशेष आहे. तसंच प्रेम प्रत्येकाचं आपापल्या भाषेतील चित्रपटावर असायला हवं.
– गिरीश कुलकर्णी