Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मिशन ऑल आउट मध्ये 48 बंदुका, 150 कोयते व 110 गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

6

पिंपरी चिंचवड,दि.०५:-पिंपरी चिंचवड शहरातील आयुक्त विनयकुमार चोबे यांनी ऑपरेशन ऑल आऊट राबवलं आहे.शेकडो शस्त्रे त्याचबरोबर शंभरहून अधिक गुन्हेगारांना जेरबंद पोलिसांनी केलं आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनची ही मोठी कारवाई केली आहे पोलीस कारवाईत 48 बंदुका, 89 जिवंत काडतुसे, 150 कोयते जप्त करण्यात आले आहेत.हा शस्त्रसाठा केवळ पंधरा दिवसात हस्तगत केला आहे. गुन्हेगारांना हद्दपार करण्यासाठी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मिशन ऑल आउट राबवले आहे. दरम्यान यातून सुमारे दीडशे गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले आहेत.पिंपरी चिंचवड पोलीस दलातील गुंडाविरोधी पथकाने ही कामगारी करत हा शस्त्रसाठा जप्त केला आहे. पिंपरी चिंचवडची पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेलं या ऑपरेशनमध्ये पिंपरी शहरातील गुंडांच्या सात कुख्यात टोळ्या विरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करत सुमारे 110 गुन्हेगारांच्या मुसक्याही आवळल्या गेल्या आहेत.अनिल तुकाराम मोहिते टोळी आणि त्यातील, 10 सदस्य, हिरा बहादुर हमाल टोळी व 07 सदस्य, शुभम सुरेश म्हस्के व इतर 17, दत्ता बाबु सुर्यवंशी व इतर 3, आकाश राजू काळे व इतर 06, विशाल विष्णू लष्करे व इतर 30, कुणाल धिरज ठाकुर व इतर 29, अक्षय मुकुंद गायकवाड एमपीडीए अंतर्गत स्थानबध्द करण्यात आले आहे.पिंपरी चिंचवड पोलीस दलाच्या या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारांची धाबे दणाणले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.