Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

​’या’ फाईल शेअरिंग आणि व्हिडीओ ए़डिटिंग ॲप्सना गुगलनं प्ले स्टोअरमधून काढलं, तुम्हीही लगेच करा डिलीट!

22

लाखो डाऊनलोड्स असणारे व्हिडीओ एडिटिंग ॲप्सवरही बंदी

Noizz या व्हिडीओ एडिटिंग ॲपने गुगल प्ले स्टोअरवर १००,०००,००० डाउनलोड्सचा आकडा पार केला आहे. नावाप्रमाणेच हे ॲप व्हिडीओ एडिटिंगसंबधित बरीच कामे करते. पण यामध्ये स्पायवेअर आढळल्याने या ॲपला गुगलनं स्टोअरमधून रिमूव्ह केलं आहे. यासोबतच MVBit – MV व्हिडिओ स्टेटस मेकर हे देखील व्हिडिओ एडिटिंग संबधित ॲपही गुगलने काढले असून याचे डाऊनलोड्सही ५०,०००,००० पेक्षा जास्त आहेत.

वाचा : Upcoming Smartphones : नवा फोन घ्यायचा विचार करताय? थांबा, भारतात लाँच होत आहेत दमदार स्मार्टफोन्स

VFly आणि Biugo ही ॲप्सही करा डिलीट

vfly-biugo-

VFly हे व्हिडिओ एडिटिंग ॲप देखील ५०,०००,००० अधिक डाउनलोड असणारं ॲप आहे. यातही दमदार फीचर्स असले तरीही यावरही गुगलने स्पायवेअरच्या आरोपामुळे बंद घातली आहे. याशिवाय
Biugo हे व्हिडीओ एडिटिंग ॲपही या यादीत आहे. यात वापरकर्त्यांना मजेदार आणि मल्टी-थीम व्हिडिओ तयार करता येत होते. याचे डाऊनलोड्सही ५०,०००,००० इतके असूनही यालाही रिमूव्ह करण्यात आलं आहे.
​वाचा : Aadhar Update : मोफत ऑनलाइन आधार अपडेटची तारीख वाढवली, १४ जून नाही ‘या’ तारखेपर्यंत आहे संधी​

या गेम्समध्येही व्हायरस

या गेम्समध्येही व्हायरस

क्रेझी ड्रॉप हा एक फारच अॅडिक्टिव्ह गेम आहे. ज्याचे डाऊनलोड्सही १०,०००,००० इतके असून त्यालाही गुगलनं प्ले स्टोअरमधून रिमूव्ह केलं आहे. याशिवाय CashEM हा ही एक प्रकारचा गेम असून याचेही ५,०००,००० पेक्षा जास्त डाउनलोड आहेत. याच कॉईन्स जमा करायचे असतात ज्यातून खरी-खुरी बक्षीसं मिळतात. या अॅपलाही गुगलनं काढून टाकलं आहे.

वाचा : १८ जूनला Father’s Day, वडिलांना गिफ्ट करण्यासाठी हे आहेत परफेक्ट ऑप्शन

Zapya फाईल शेअरिंग ॲपही गुगलनं काढलं

zapya-

एकेकाळी हे ​Zapya नावाचं फाईल शेअरिंग ॲपही जबरदस्त फॉर्ममध्ये होतं. अनेकजण एकमेंकाकडून व्हिडीओ, ऑडिओ, फोटो आणि ॲप्स शेअर करण्यासाठी हे ॲप वापरत होते. त्यामुळेच याचे डाऊनलोड्सही १००,०००,००० पेक्षा जास्त असून आता मात्र गुगलनं याला प्ले स्टोअरमधून रिमूव्ह केलं आहे. म्हणून हे तुम्हीही वापरत असल्यास त्वरीत Uninstall करा.

वाचा: UPI ने पेमेंट करताना सारखं फेल होतंय? ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो

​Cashzine ॲपही केलं रिमूव्ह

cashzine-

कॅशझिन नावाचं ॲपही रिमूव्ह करण्यात आलं आहे. या ॲपचे १०,०००,००० डाउनलोड्स आहेत आणि ते वापरकर्त्यांना अॅपवरील लेख आणि कादंबरी वाचून सोन्याचे नाणे बक्षिसं म्हणून जिंकण्याची संधी देते. ही सोन्याची नाणी PayPal आणि GCash सारख्या पेमेंट पद्धतींद्वारे रोख रकमेसाठी त्वरित बदलली देखील जाऊ शकतात.

​वाचा : AC मुळे लाईट बिल खूप येतंय? ‘या’ ५ टिप्स फॉलो केल्यास वाचेल वीज आणि कमी येईल वीजबिल

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.