Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कोकणातील ‘या’ कारागृहाची गोष्टच निराळी! कैदी करतायत भाजीपाला लागवड, लाखोंचं उत्पन्न घेतलं

7

सिंधुदुर्ग: कारागृह म्हटलं की बंदिस्त इमारत आणि खडी फोडणारे कैदी असेच चित्र डोळ्यासमोर कायम उभ राहतं. परंतु सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहात पाहिले तर कैद्यांना मोकळे सोडलेले दिसेल. या जिल्हा कारागृहातील कैदी अगदी मन लावून भाजीच्या शेतीत काम करताना दिसतात. त्यामुळे कारागृह नव्हे, तर कृषी पर्यटन केंद्राला भेट दिल्याचा आनंद होतो. सिंधुदुर्ग जिल्हा कारागृह संपूर्ण राज्यात आदर्शवत असे ठरले आहे.

या कारागृहात योगा शिबीर, जीवनविद्या मिशन मार्फत प्रार्थना असे विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यामुळे बंदिवानांवर चांगले संस्कार होऊन त्यांच्यात सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. ओरोस मुख्यालय येथे २०१६ मध्ये जिल्हा कारागृह सुरू झाले. आजपर्यंत असा उपक्रम कधीच राबविला गेला नाही. या कारागृहात जवळपास ९६ न्यायदिन आणि बंदी कैदी आहेत. त्यापैकी शिक्षा दिन खुल्या कारागृहातील १९ बंदी असे मिळून ४२ बंदी अहोरात्र काम करत असतात. कारागृहाच्या आतील परिसरामध्ये दोन एकर क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाल्यांची लागवड केली आहे. बंदी कारागृहातून आल्यानंतर खुल्या कारागृहातील बंदींना दहा ते बारा वर्ष होतात.
काळ आला पण…! हॉटेलमध्ये अचानक कोसळली; एनसीसी विद्यार्थ्यांची हुशारी अन् महिलेला मिळाले जीवनदान
कारागृहामध्ये त्यांच्या हाताला काम दिलं तर त्यांना रोजगार मिळतो. त्यातून त्यांना सरकारकडून वेतन दिलं जातं. मात्र इथल्या कैद्यांना हाताला काहीच काम नसल्यामुळे वेतन मिळत नव्हतं. त्यामुळे ते तणावग्रस्त असायचे. तसेच घराच्या परिस्थितीमुळेही तणावग्रस्त असायचे. या ठिकाणी रोजगार देण्यासाठी कोणतेही साधन सामग्री उपलब्ध नव्हती. या ठिकाणी जमीन मुबलक प्रमाणावर आहे. ही जमीन साफ करण्यासाठी ३ ते ४ महिने आमचे सुरुवातीचे गेले. त्यानंतर या जागेवर मशागत केली. वेगवेगळ्या प्रकारच्या खत आणि जीवामृत वापर केला. या मशागतीसाठी खुल्या कारागृहातील बंदी अहोरात्र मेहनत करत असतात.

अधीक्षक रवींद्र टोणगे यांना कोणताही शेतीचं गधं नव्हता. पूर्वीपासून वडिलांचा गारमेंटचा व्यवसाय होता. टोणगे हे ठाणे शहरात रहायचे. मात्र टोणगे यांनी जिद्द चिकाटी, मेहनत घेत कारागृहाच्या आतील जागेचं नंदनवन केलं आहे. या कारागृहाच्या आतील जागा जंगलमय पडीकच जागा होती. मात्र २०२२ मध्ये जिल्हा कारागृह अधीक्षक रवींद्र टोणगे हे रुजू झाल्यानंतर आणि कारागृहातील आतील जगंलमय काही भाग बघून त्यांना विचित्र वाटायचं. अधीक्षक रवींद्र टोणगे यांनी भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर यांची सहकार्य घेत आणि बंदिवान कैद्यांची मद्यत घेऊन प्रबळ इच्छाशक्ती जोरावर अक्षरशः त्यांनी कायापालट केला. कारागृहाच्या आतील पडीक जमिनीची मशागत करून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांची लागवड केली आहे. त्यामुळे आता कारागृहाचे नंदनवन झाल्याचे पाहायला मिळत आहे.

प्लीज नाही, जरागेंवर प्रश्न आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी उत्तर टाळलं

बंदिवान कैद्यांमार्फत कारागृहाच्या परिसरामध्ये गवार, शेवगा शेंग, पडवळ, भेंडी, कारले, वाल शेंग, चवळी, दुधी भोपळा, काकडी, हिरवी मिरची, वांगे, दोडके इत्यादी फळभाजी आणि लाल माठ, हिरवा माठ, पालक, मुळा, कोथिंबीर जवळपास २७ प्रकारच्या पालेभाज्यांची लागवड केली आहे. या कारागृहातील बंदीना भाज्या दिल्या जातात. तसेच सावंतवाडी येथे वर्ग २ चे कारागृह त्या ठिकाणी भाजी पाठवली जाते. उर्वरित भाजी सरकारी दराप्रमाणे स्थानिक बाजारात विकली जाते. त्यातून उत्पन्न ९ महिन्यांमध्ये ३ लाख ९८ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे.

केलेल्या कार्याची दखल घेत राज्याचे पोलीस महानिरीक्षकांनी या उपक्रमांचे विशेष कौतुक केले आहे. मात्र या कारागृहात केवळ शेती करून थांबले नाही तर एक गाय आणि वासरू आणून गोपालन सुरू केले आहे. गोपालनामुळे शेतीसाठी लागणारे जीवामृतही तयार करून शेतीसाठी वापरण्यात येते. कारागृहातील शेती करण्यामध्ये जसे कारागृह अधीक्षक रवींद्र टोणगे यांचे मोठे योगदान आहे. मात्र जिल्हा कारागृहाचे नंदनवन करणारे अधीक्षक रवींद्र टोणगे यांची मुंबईत ऑर्थर रोड कारागृहात बदली झाली आहे. मात्र २ एकर क्षेत्रांवर केलेली शेतीचं काय होणार असा प्रश्न देखील समोर पडला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.