Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने उध्वस्त केले आंतराज्यिय गांजाचे रॅकेट…

6

गांजा तस्करीचे आंतरराज्यिय रॅकेट स्था. गु.शा. हिंगोली कडुन उध्वस्त, तब्बल १७,८३,९६०/- रूपये किंमतीचा ८९ किलो १९८ ग्रॅम गांजा जप्त….

हिंगोली(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधीक्षक, हिंगोली यांनी स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली यांना अवैध धंदयाविरूध्द व शासनाने प्रतिबंधीत केलेला गांजा लागवड व विकी विरूध्द प्रभावी कार्यवाही करण्याचे सुचना पोलिस निरीक्षक पाटील, स्था.गु. शा. हिंगोली यांना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने स्था. गु. शा. चे सपोनि.शिवसांब घेवारे यांचे पथक हे रात्रगस्तीवर होते.
दिनांक ११/०१/२०२४ रोजी रात्रगस्त दरम्यान पो.स्टे. वसमत शहर, वसमत ग्रामीण हद्दीत स्था.गु.शा. पथक पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मौजे खुदनापुर शिवारात विहिरीजवळ नागोराव विश्वनाथ चव्हाण याचे शेतामध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेला गांजा बेकायदेशीरपणे विक्री करण्यासाठी साठवणुक केली आहे व सदरचा गांजा हा परराज्यातुन खरेदी करून आणला आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने, स्था.गु.शा.. पथकाने छापा कार्यवाहीकामी लागणारे सर्व साहित्यासह तात्काळ रवाना होवुन मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी छापा मारला असता तेथे खाकी रंगाचे चिकट टेपने चिपकवलेले तब्बल ४० पुठ्याच्या बॉक्स मिळून आले. सदर बॉक्समध्ये गांजाच्या झाडाचा बारीक केलेला वाळलेला पाला पाचोळा हिरव्या रंगाचा उग्रट वास येत असलेला एकुण ८९ किलो १९८ ग्रॅम वजनाचा एकुण १७,८३,९६०/- रूपये किंमतीचा गांजाचा माल मिळाल्यामुळे तो जप्त करण्यात आला व सदरचा गांजा परराज्यातुन खरेदी करून आणुन स्वतःच्या शेतामध्ये साठवणुक करणारा आरोपी

आदिनाथ नागोराव चव्हाण, रा. खुदनापुर, ता. वसमत, जि. हिंगोली

याचेविरुध्द सपोनि.  शिवसांब घेवारे, स्था.गु.शा. हिंगोली यांचे फिर्यादीवरून पो.स्टे. वसमत ग्रामीण गुरनं. ०५/२०२४ कलम ८ (क), २०(ब)ii एन.डी.पी.एस. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, पो.नि.  विकास पाटील, स्था. गु.शा. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील स.पो.नि.शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार राजु ठाकुर, नितीन गोरे, आकाश टापरे, आजम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, प्रशांत वाघमारे यांनी केली आहे. तसेच सदर छापा कार्यवाहीसाठी पो.स्टे. वसमत शहरचे पोउपनि. महीपाळे , सपोउपनि शेख हकीम, मपोशि/मगर यांनी मदत केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.