Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
घरफोडीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगाराला, 08 लाख रुपयाच्या सोन्याचे 124 ग्राम वजनाचे दागिने व रोख रक्कमेच्या मुद्देमालासह अटक. घरफोडीचे 9 गुन्हे उघड. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, लातूर जिल्ह्यातील वेग-वेगळ्या पोलिस ठाणे हद्दी मध्ये रात्रीच्यावेळी राहते घराचा कडी-कोंडा तोडून घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. त्यावरून जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस स्टेशनला घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
सदरचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेशित केले होते. त्यावरून पोलिस अधीक्षक सोमय मुंडे ,अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अमलदारांचे पथके तयार करून त्यांना सखोल मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या होत्या.
सदर पथकाकडून गुन्ह्या संदर्भात बारकाईने तपास सुरू असताना मोठ्या प्रमाणात बातमीदार नेमून तसेच तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेण्यात येत होते.वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदरच्या पथकांनी केलेल्या परिश्रमामुळे पथकांना गुप्त बातमीदाराकडून घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती मिळाली.घरफोडीतील गुन्हेगार त्याने चोरलेला सोन्याचा मुद्देमाल विकण्यासाठी अहमदपूर बसस्थानक परिसरात फिरत आहे अशी माहिती मिळाली. सदर माहितीची खातरजमा करून सदरचे पथक तात्काळ अहमदपूर येथे रवाना करण्यात आले सदर पथकाने अहमदपूर येथे पोहोचून बस स्थानक परिसरात फिरत असलेल्या संशयित आरोपीला ताब्यात घेतले.
सदर पथकांनी अतिशय कुशलतेने सापळा लावून घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला दिनांक 12/02/2024 रोजी ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव
1) छोटा मोहन बापुराव भोसले, वय 34 वर्ष राहणार कुरुळा, तालुका कंधार, जिल्हा नांदेड असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे असलेल्या पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये सोन्याचे वेगवेगळे दागिने दिसून आले त्याबाबत त्याच्याकडे विचारले तेव्हा त्याने त्याच्या इतर आणखीन पाच साथीदारासह मिळून लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरफोडीचे गुन्हे केल्याचे व त्या गुन्ह्या मध्ये चोरलेला, त्याच्या हिश्याला आलेले सोन्याचा दागिन्याचा मुद्देमाल व रोख रक्कम असल्याचे कबूल केले.
लातूर जिल्ह्यात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याच्या अभिलेखाची पाहणी केली असता नमूद आरोपीनी पोलिस ठाणे शहाजानी औराद, पोलिस ठाणे औसा, पोलिस ठाणे निलंगा, पोलिस ठाणे किल्लारी, पोलिस ठाणे देवणी, पोलिस ठाणे कासार शिरशी, पोलिस ठाणे शिरूर अनंतपाळ येथे एकूण 9 घरफोडी चे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.त्यावरून नमूद आरोपीस त्याने चोरलेल्या 124 ग्राम सोन्याचे दागिने व 22,000/- हजार रुपये रोख असा 08 लाख 03 हजार रुपयाच्या मुद्देमालासह पुढील कारवाई करिता पोलिस ठाणे औराद शहाजानी यांचे ताब्यात देण्यात आले आहे. असून त्याच्या सोबत असलेल्या फरार आरोपी साथीदाराचा शोध सुरू आहे.
वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलिस पथकांनी अतिशय उत्कृष्टरित्या तपास करून बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण राठोड, पोलिस अमलदार माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, मोहन सुरवसे, राजेश कंचे, रामभाऊ मस्के, तुराब पठाण, जमीर शेख, संतोष खांडेकर, नकुल पाटील यांनी केली आहे.