Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Pune Kondhwa किरकोळ भांड्याच्या रागातून बिल्डिंगमध्ये चोरी करणाऱ्या महिला आरोपीला कोंढवा पोलिसांकडून अटक

71

पुणे : परवेज शेख

Pune : कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत काकडेवस्ती ईशा बिल्डींग, काकडे वस्ती गल्ली नं. ०३, कोंढवा पुणे येथे राहणारे शाहरुख फारुख शेख हे दि.०२/०२/२०२४ रोजी दुपारी १२.०० ते ०२.४५ वा च्या सुमारास लॉक लावुन घर बंद असताना घराचे लॉक अज्ञात चोरटयाने उघडुन बेडरुम मधील कपाटातील सोन्याचे मंगळसुत्र, रोख रक्कम असा एकुण ३७,००० /- रु. कि मुद्देमाल चोरी करुन नेला आहे. म्हणुन दिवसा घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयातील फिर्यादी यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने तपास करित असताना घराची चावी घराच्या बाहेर ठेवत होता का, तसेच त्याच्याकडे घरी नेहमी बिल्डींगमधील कोण गप्पा मारण्यासाठी येत होते, तसेच त्याचे दागिणे घरात कोठे ठेवता याबाबत कोणाला माहिती होती, तसेच त्याचे कोणाशी वाद झालेले आहेत का, त्याच्या घराची चावी कोणाकडे ठेवण्यासाठी देता का, किंवा त्याचे घराचे कुलूप कोणाला वापरण्यासाठी दिले होते का याबाबत तपास केला असता त्यांनी त्याच्या बिल्डींग मध्ये फलॅट नं. २०२ मध्ये राहणारी महिला नामे सलमा अब्बास शेख, वय २४ वर्षे रा. लेन नं. ३ काकडेवस्ती फलॅट नं.२०२ ईशा बिल्डींग कोंढवा पुणे हिने तिच्या घराला लावण्यासाठी कुलूप नेले असल्याचे तसेच तिला घरात कोठे दागिणे ठेवत असता याबाबत माहिती असल्याचे सांगितले.सदर संशयीत महिला आरोपी सलमा अब्बास शेख, वय २४ वर्षे रा. लेन नं. ३ काकडे वस्ती फलॅट नं. २०२ ईशा बिल्डींग कोंढवा पुणे हीस पोलीस ठाणे येथे बोलावुन पोलीस अंमलदार शहिद शेख, संतोष बनसुडे, लक्ष्मण होळकर, अमोल हिरवे व महिला अंमलदार हिगमिरे यांच्यासह कौशल्यपुर्ण व पोलीस खाक्या दाखवुन तपास केला असता तिने फिर्यादी यांच्या सोबत वाद झाले होते. त्यामुळे दि. ०२/०२/२०२४ रोजी दुपारी ०१.०० वा सुमारास फिर्यादी यांच्या घराची चावी त्यांनी बाहेर ठेवल्याचे माहिती असल्याने ती घेवुन घरात जावुन कपाट उघडुन चोरी केल्याचे कबुल केले. सदर महिल्याच्या घराची घरझडती घेतली असता चोरी केलेले दागिणे तिच्या धरातील बंद वॉशिग मशीनमध्ये लपवुन ठेवल्याचे मिळुन आले असुन ते जप्त करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. अमितेशकुमार सो पोलीस आयुक्त, मा. मनोज पाटील सो, अपर पोलीस आयुक्त, पुर्वे प्रादेशिक विभाग,मा. आर राजा, पोलीस उप आयुक्त सो परि. ०५, मा. शाहुराव साळवे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, सहा पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, पो.हवा. अमोल हिरवे, शहिद शेख, संतोष बनसुडे, लक्ष्मण होळकर, पो. शि.अभिजीत रत्नपारखी, पो. शि. जयदेव भोसले, पो.शि.विकास मरगळे, पो. शि. राहुल थोरात, पो. शि. सुहास मोरे, पो शि अभिजीत जाधव, पो.शि.आशिष गरुड, पो. शि. रोहित पाटील यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.