Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
बनावट कागदपत्रे तयार करून आरोपींना जामीन मिळवून देणारी टोळी नाशिक रोड पोलिसांचे दहशतवाद विरोधी पथकाचे ताब्यात….
नाशिक (शहर प्रतिनिधी) – बनावट कागदपत्रे तयार करून न्यायालयात बोगस जामीनदार हजर करून आरोपींना जामीन मिळवून देणाऱ्या टोळीला नाशिक रोड पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पो.ठाणे गुरनं. २८२/२०२४ कलम ४२०,४६५,४६७,४६७,४६८,४७१,४७२,३४ भा.द.वि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी नामे १) अवद नारायण रामावर उपाध्याय २) नितीन नाथा महाले (वय- ३८ वर्षे) ३) अरूण पंजाबराव गरूड (वय ४५ वर्षे) ४) सचिन कैलास शिरसाट (वय- ३८ वर्षे) ५) राकेश बालु नाथव ६) दविद लमूवेल गायकवाड यांना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, नाशिक शहर पोलीस आयुक्त संदिप कर्णिक पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२, श्रीमती मोनिका राऊत, सहा. पोलीस आयुक्त नाशिकरोड विभाग डॉ.सचिन बारी, यांनी नाशिक, निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीतील दहशतवादी विरोधी पथकाला हद्दीतील हॉटेल व लॉनेस तपासणी करणेकामी आदेशित केले होते. वरिष्ठांचे आदेशान्वये नाशिकरोड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांना दहशतवादी विरोधी पथकाचे अंमलदार यांना सुचना देऊन कारवाई करणेबाबत आदेशित केले होते.
(दि.१४ मे) रोजी वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व आदेशाप्रमाणे दहशतवादी विरोधी पथकाचे पोहवा संदीप पवार, पो.ना. हेमंत मेडे, पो.सि. राहुल मेहेंदळे असे नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील हॉटेल व लॉजेस चेक करत असतांना नाशिकरोड रेल्वे स्टेशन जवळ असणारे साई लॉजमधील थांबलेल्या इसमांकडे चौकशी करत असताना एका खोलीतील ०४ इसमांचा संशय आल्याने त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत सदर इसमांची नावे १) अवदेश नारायण रामाधर उपाध्याय (वय- ४१ वर्षे) २) नितीन माथा महाले (वय ३८ वर्षे) ३) अऊण पंजाबराव गरूड (वय- ४५ वर्षे) ४) सचिन कैलास शिरसाट (वय ३८ वर्षे) असे असल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी अवदेश नारायण रामाधर उपाध्याय याच्याकडे त्याचा स्वतःचा फोटो असलेले वेगवेगळे नाव व क्रमांक असलेले तीन आधारकार्ड तसेच इतर बनावट कागदपत्रे, व इतर तीन इसमांकडे बनावट रेशनकार्ड, महसुल विभागाचे बनावट शिक्के मिळून आले. सदरबाबत चौकशीअंती वर नमुद चार इसम हे ५) राकेश बाळु जाधव ६) प्रमोद प्रल्हाद नार्वेकर ७) दविद लमूवेल गायकवाड यांच्या मदतीने बनावट आधारकार्ड, रेशनकार्ड तयार करून त्या द्वारे बोगस जामीनदार नाशिक जिल्हयातील वेगवेगळ्या न्यायालयात हजर करून त्या द्वारे वेगवेगळ्या आरोपींचा जामीन करून घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्या नुसार नाशिक रोड पो.ठाणे गुरनं. २८२/२०२४ कलम ४२०,४६५,४६७,४६७,४६८,४७१,४७२,३४ भा.द.वि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी नामे १) अवदेश नारायण रामावर उपाध्याय २) नितीन नाथा महाले (वय- ३८ वर्षे) ३) अरूण पंजाबराव गरूड (वय ४५ वर्षे) ४) सचिन कैलास शिरसाट (वय- ३८ वर्षे) ५) राकेश बालु नाथव ६) दविद लमूवेल गायकवाड यांना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे, या गुन्हयाचा पुढील तपास सपोनि. प्रविण सुर्यवंशी हे करत आहेत.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ-२, मोनिका राऊत, यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस आयुक्त, नाशिकरोड विभाग डॉ.सचिन बारी, नाशिकरोड पोलिस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, पोलिस निरीक्षक बडेसाहब नाईकवडे (गुन्हे), गुन्हे शोथ पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रविण सुर्यवंशी, पोहवा पवार, नापोशि हेमंत मेढे, पोशि राहुल मेहेंदळे पोहवा विजय टेंमगर, पोहवा विष्णु गोसावी, पोशि. नाना पानसरे, पोशि. दत्तात्रय वाजे, पोशि संतोष पिंगळ, पोशि सागर आडणे, पोशि.अजय देशमुख, पोशि. केतण कोकाटे, पोशि. कल्पेश जाधव, पोशि गोकुळ कासार, पोशि रोहित शिंदे, चापोशि योगेश रानडे, यांनी केली आहे.