Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

छोटा गोंदिया खुन प्रकरणातील आरोपीस गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

8


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

छोटा गोंदिया खुन प्रकरणातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि (23) रोजी रात्री 11.30 वाजता चे दरम्यान जितेश चौक, छोटा गोंदिया या ठिकाणीं यातील म्रुतक राहुल दिलीप बिसेन वय 22 वर्ष, रा. छोटा गोंदिया यास आरोपी प्रतीक ऊर्फ सोनु राजेंन्द्र भोयर वय 23 वर्ष, रा. जितेश चौक, छोटा गोंदिया यांनी त्यांचेमध्ये झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरून  प्रतीक भोयर याने मृतक-राहुल बिसेन याचे पोटावर, छातीवर व कोथ्यावर धारदार चाकुने वार करून जिवानिशी ठार केले.

यावरुन मृतकाचे वडील दिलीप जिवनलाल बिसेन रा. छोटा गोंदिया यांचे तक्रारी वरून पोलिस स्टेशन गोंदिया शहर येथे अपराध क्रं. 332/2024, कलम 302 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच  सदर गुन्हयातील आरोपी  प्रतीक ऊर्फ सोनु राजेंद्र भोयर हा खुन केल्यानंतर घटनास्थळावरुन लगेच पळुन गेला होता सदर  गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे,  यांनी खुनाचा गंभीर गुन्हा करणाऱ्यास तात्काळ जेरबंद कऱण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले होते

त्यानूसार  वरिष्ठांचे  आदेशाप्रमाणे गुन्हेगार आरोपीस जेरबंद करण्या करीता गोंदिया शहर पोलिस स्टेशनचे प्रभारी सपोनि सोमनाथ कदम, यांचे नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार, यांचे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक अशी विविध पथके आरोपीच्या शोधाकरीता नेमण्यात आली होती गोंदिया शहर पोलिस पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिस पथकांनी संयुक्तपणे तात्काळ कारवाई करून आरोपीचा शोध घेऊन अतिशय शिताफीने आरोपी  प्रतीक ऊर्फ सोनु राजेंद्र भोयर वय 23 वर्ष, रा. जितेश चौक, छोटा गोंदिया यास जेरबंद करून गुन्ह्यात अटक केली आहे सदर गुन्हयाचा प्राथमीक तपास पोउपनि मंगेश वानखडे यांनी केला असुन गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल पुढील तपास उपविभागिय पोलिस अधिकारी,गोंदीया रोहीनी बानकर ह्या करीत आहेत..

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभाग गोंदिया, रोहिनी बानकर, यांचे  मार्गदर्शनाखाली पोलिसठाणे गोंदिया शहर चे पोलिस निरिक्षक  चंद्रकांत सुर्यवंशी, यांचे पथक सपोनि सोमनाथ कदम, सपोनि विजय गराड, सपोनि संजय पांढरे, पोउपनि मंगेश वानखडे, पोउपनि घनश्याम थेर, मपोउपनि पुजा सुरळकर, पोहवा कवलपालसिंग भाटीया, जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, दिपक रहांगडाले, प्रमोद चव्हाण, श्याम कोरे, मपोहवा. रिना चौव्हाण, पोशि. दिनेश बिसेन, मुकेश रावते, सुभाष सोनवाने, अशोक रहांगडाले, सनोज सपाटे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सपोनि विजय शिंदे, पोउपनि महेश विघ्णे, पोहवा राजु मिश्रा, महेश मेहर, संतोष केदार, इंद्रजित बिसेन, रियाज शेख, अजय रहांगडाले, चालक गौतम यांनी कामगिरी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.