Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडला शहरात येणारा अवैध दारुसाठा…

9


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाने रात्र पेट्रोलिंग दरम्यान पकडला शहरात अवैध विक्रीकरीता येणारा दारुसाठा, दुचाकीसह दारुसाठा केला जप्त…

हिंगणघाट(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरण पथकाचे अंमलदार हे शहरात  रात्र गस्त पेट्रोलिंग करीत असता,खबरी कडुन गोपनीय खात्रीशीर माहीती मिळाली की, दोन इसम त्याचे ताब्यातील ज्युपिटर मोपेड गाडीने महेश ज्ञानपीठ शाळेकडून तेलखडी कडे दारूची वाहतूक करणार आहे सदर बातमीची शहानीशा करुन सदरची माहीती पोलिस निरीक्षक मनोज गभने पो. स्टे. हिगणघाट यांना देवून त्याचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात पंच व पोलिस पथकासह नाकेबंदी करीत असताना ज्युपिटर मोपेड वर दोन इसम येताना दिसले.

त्याना थांबवून मोपेड चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव शंकर अरविंद ढोकपांडे वय 21 वर्ष रा. संत कबीर वार्ड हिंगणघाट व मागे बसलेल्याचे नाव तेजस दत्तू जी मेश्राम वय 24 वर्ष राहणार इंदिरानगर बंगाली कॅम्प चंद्रपूर हल्ली मुक्काम इंदिरा गांधी वार्ड हिंगणघाट यांचे ताब्यातून 1) सात खरड्याच्या खोक्यात प्रीमियम नंबर वन कोकण देशी दारूचा 700 शीशा किंमत 70,000रू, 2) टीव्हीएस कंपनीची जुपिटर मोपेड क्र MH32 AV 2979 कीं 1,00,000रू असा एकूण जुमला किंमत 1,70,000रू चा  दारुचा माल  अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आल्याने पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे अपराध क्रमांक 921/2024 कलम 65(अ )(ई ), 77(अ ) दारूबंदी कायदा सह कलम 3(1),181,130/177 मोवाका अन्वये गुन्हा नोंद करून करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नुरूल हसन,अप्पर पोलिस अधिक्षक डाँ सागर रतनकुमार कुमार कवडे,उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडीत,पोलिस निरीक्षक मनोज गभने पोलिस स्टेशन, हिंगणघाट यांचे निर्देशाप्रमाणे पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोउपनि भारत वर्मा, पोलिस हवालदार प्रशांत ठोंबरे, नापोशि राहुल साठे, पोशि आशिष नेवारे,विजय काळे,अमोल तिजारे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.