एरंडोल येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन प्रसंगी माजी पालक मंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या कडून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची पाठराखण

जळगाव जिल्हा विशेष प्रतिनिधी :- शैलेश चौधरी

एरंडोल:येथे गॅस,पेट्रोल,डिझेल व खतांच्या दरवाढीच्या निषेधार्थ एरंडोल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शुक्रवारी ९जुलै २०२१ रोजी धरणगाव हायवे चौफुलीवर रास्ता रोको व धरणे आंदोलन करण्यात आले जवळपास पंचवीस ते ३५ मिनिटांच्या या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प झाली त्यानंतर सायकल रॅली आंदोलन करण्यात आले तसेच प्रांताधिकारी विनय गोसावी यांना निवेदन देण्यात आले.धरणगाव चौफुलीवर झालेल्या रास्ता रोको आंदोलनाप्रसंगी इंधन दरवाढीच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.या वेळी माजी मंत्री नेते एकनाथराव खडसे यांच्यावर सुडबुद्धीने सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी केली जात आहे या आधी त्यांच्या मागे ED का नाही लागली..? ते भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यावरच का चौकशी चालू झाली…? हेतू पुरस्कृत त्यांना त्रास दिला जात असल्याचे सांगत माजी पालकमंत्री सतीश अण्णा पाटील यांनी त्यांची पाठराखण केली.राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र प्रमुख पराग पवार,जिल्हा सरचिटणीस अमित पाटील,डॉ.राजेंद्र देसले, तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक प्रा.मनोज पाटील,डॉ. सुभाष देशमुख,सुदाम पाटील,प्रभाकर बडगुजर,पारोळा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत पाटील,नगरसेवक नितीन चौधरी,नगरसेवक अभिजीत पाटील,विश्वास पाटील, किशोर पाटील,ज्ञानेश्वर पाटील,दत्तू पाटील,रामधन पाटील, उमेश देसले,राजेंद्र शिंदे,दशरथ चौधरी,गुंजन चौधरी,ॲड.अहमद सय्यद, कपिल पवार,रवींद्र देवरे,दशरथ पाटील,विजय पाटील,नरेश भोई,अस्लम पिंजारी,अश्फाक बागवान,नगरसेविका वर्षा शिंदे,ईश्वर बिर्हाडे,राजेंद्र शिंदे,रोहिदास पाटील,प्रशांत पाटील,दिनेश पवार,गोपाळ पाटील,ज्ञानेश्वर पाटील,विकास पाटील, एकनाथ पाटील,एन डी पाटील,भिकन खाटीक आदी तालुक्यातील सरपंच,उपसरपंच व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.यावेळी एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

Comments (0)
Add Comment