Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

प्रकाश आंबेडकर यांच्या प्रकृतीत सुधारणा, शायना यांच्या नावापुढील ‘एनसी’चा अर्थ काय?

10

Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या ठळक बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी

१. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये यंदा इच्छुकांची गर्दी होती. ३६ विधानसभा मतदारसंघांसाठी पक्षातील तब्बल ९००हून अधिक इच्छुकांनी अर्ज केले. मात्र मुंबईत पक्षाच्या वाट्याला केवळ ११ जागाच आल्या. या ११ उमेदवारांमध्ये दोनच मराठी उमेदवार आहेत. येत्या निवडणुकीत त्याचा पक्षाला फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बातमी वाचा सविस्तर…
२. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आमदार प्रशांत ठाकूर यांची मालमत्ता पाच वर्षांत तिपटीने वाढली आहे. तब्बल १४६ कोटींचे मालक असलेल्या आमदारांना शेती, आमदारकीचे मानधन, व्याज, जागेचे आणि घरांचे भाडे आणि शेअर्समधील गुंतवणूक यामधून उत्पन्न मिळते. पाच वर्षांपुर्वी ५५ कोटी रूपयांची मालमत्ता आता तब्बल १४६ कोटी इतकी झाली आहे.

३. राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर छाननीची प्रक्रिया सुरू झाली होती. राज्यभरातील २८८ मतदारसंघांत प्राप्त झालेल्या अर्जांच्या छाननीनंतर कुठल्या मतदारसंघात सर्वाधिक उमेदवार, तर कुठल्या मतदारसंघात सर्वात कमी उमेदवार आहेत हे स्पष्ट झाले आहे.

४. नाशिकमध्ये महायुतीला अडचणीच्या ठरणाऱ्या काही जागांवर मनसे उमेदवारांना माघार घेण्याचा संदेश देण्यात आल्याची चर्चा रंगल्यानंतर नाशिक मध्यचे ‘मनसे’चे उमेदवार अंकुश पवार यांनी आपला प्रचार थांबवला आहे. ‘मनसे’चे इंजिनच यार्डात गेल्याने ‘नाशिक मध्य’बाबतचा सस्पेन्स वाढला आहे.

५. राजू शेट्टी कधीही कोणालाही विश्वासात घेत नाहीत. कोणताही मोठा निर्णय घेताना प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षांना हे विचारत नाहीत. ते कोणालाही न विचारता मनमानी पद्धतीने निर्णय घेतात. यामुळे कार्यकर्ते दुखावले जात असून यामुळे चळवळ संपत चाललीय आणि याला सर्वस्वी जबाबदार स्वतः राजू शेट्टी आहेत. बातमी वाचा सविस्तर…

६. मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार शायना एन. सी. यांच्याविरोधात शिवसेना (उबाठा) खासदार अरविंद सावंत यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाची राष्ट्रीय आणि राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सविस्तर अहवाल सादर करावा, असे आदेश दोन्ही आयोगांनी दिले आहेत.

७. दिग्दर्शक रोहित शेट्टीचा मल्टीस्टारर चित्रपट ‘सिंघम अगेन’ दिवाळीच्या मुहूर्तावर १ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत अक्षय कुमार, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, करीना कपूर, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ अशी तगडी स्टारकास्ट आहे. चित्रपटाच्या शेवटी सलमान खानचा एक कॅमिओसुद्धा आहे, याबद्दल गेले काही दिवस चर्चा सुरू होती. आता त्याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. मल्टीस्टारर असण्याचा पुरेपूर फायदा या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर होताना दिसत आहे.

८. नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात लहान टेपोला (छोटा हत्ती) या वाहनाचे ब्रेक न लागल्याने वाहन वीस फूट खाली दरीत कोसळल्याची घटना एक नोन्हेंबरला दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात एकाच कुटुंबातील सतरा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींना नवापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर गंभीर जखमींना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान चरणमाळ घाटात संबंधित विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने या ठिकाणी अपघातांची मालिका सुरू आहे. बातमी वाचा सविस्तर…

९. ‘मराठा, मुस्लिम आणि दलितांच्या (एमएमडी) एकत्रीकरणावर शिक्कामोर्तब झाले असून, हेच समीकरण जुळवण्याच्या आपल्या प्रयत्नाला यश आले. आता त्यांचा आम्ही नक्की सुपडासाफ करणार. राज्यावर येणारे संकट संपवणार. हाच आपण विडा उचलला आहे. मतदारसंघ आणि उमेदवार यांची घोषणा येत्या ३ तारखेला करणार आहे,’ असे मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे स्पष्ट केले.

१०. नाशिकमध्ये महायुतीला अडचणीच्या ठरणाऱ्या काही जागांवर मनसे उमेदवारांना माघार घेण्याचा संदेश देण्यात आल्याची चर्चा रंगल्यानंतर नाशिक मध्यचे ‘मनसे’चे उमेदवार अंकुश पवार यांनी आपला प्रचार थांबवला आहे. ‘मनसे’चे इंजिनच यार्डात गेल्याने ‘नाशिक मध्य’बाबतचा सस्पेन्स वाढला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.