Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
काही आठवड्यांपूर्वी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. दमदार डायलॉग्ज, कलाकारांचे लुक, अभिनय, अॅक्शन यामुळं हा ट्रेलर चर्चेत होता. इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सिनेमाचं कौतुक केलं. तर समिक्षकांकडूनही सिनेमाला सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत.
‘आर्टिकल 370’ च्या कमाईसंदर्भात बोलायचं झालं तर, काही संकेस्थळानुसार सिनेमानं पहिल्या दिवशी तब्बल ५.७५ कोटींची कमाई केली आहे. आता विकेंडला सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सिनेमानं द कश्मीर फाइल्स सिनेमाचा ओपनिंग डेचा रेकॉर्ड मोडला आहे. द कश्मीर फाइल्स सिनेमानं पहिल्या दिवशी ३.५५ कोटींचा गल्ला जमवला होता.
सध्या या सिनेमाची टक्कर काही आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ या सिनेमासोबत आहे. तसंच विद्युत जामवालचा ‘क्रॅक’ सिनेमाही नुकताच प्रदर्शित झाला असून या सिनेमानंही चार कोटींच्या आसपास कमाई केली आहे.
आपल्या भारताचाच अविभाज्य भाग असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये असलेलं ३७० हे कलम २०१९मध्ये भारत सरकारनं रद्द केलं. हे आव्हानात्मक पाऊल उचलताना काय-काय घडलं, काय-काय तयारी करावी लागली, कुणाला कसा त्याग करावा लागला, पडद्यामागं काय-काय हालचाली घडत होत्या, याचं दर्शन या चित्रपटात पाहायला मिळत आहे. तर सिनेमातले संवादही लक्षवेधून घेत आहेत.
तगडी स्टारकास्ट
यामी गौतम, प्रियामणी, वैभव तत्त्ववादी, अरुण गोविल, किरण करमरकर, इरावती हर्षे, राज झुत्शी, डॉ. मोहन आगाशे अशी तगडी स्टारकास्ट सिनेमात पाहायला मिळतेय. अरुण गोविल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारताना दिसत आहेत.
गोड बातमी
हा चित्रपट आणि तिच्या भूमिकेबद्दल उत्सुकता असतानाच यामी आणि तिचा नवरा, दिग्दर्शक आदित्य धर यांनी हे दोघं पालक होणार असल्याची गोड बातमी दिली. दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ‘आई होणं, यासारखी दुसरी आनंदाची भावना नाही. हा आनंद मला ‘वुमेन एम्पॉवरमेंट’ची प्रचिती देणार आहे, असं यामी सांगते.’ शुभेच्छांसाठी तिनं चाहत्यांचे आभारही मानले आहेत.