Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कॅन्सरवर दोनदा केली मात पण मेंदू आणि हृदयासमोर हरली; ऐन पंचविशीत अभिनेत्रीला मृत्यूने गाठलं

8

Aindrila Sharma Birth Anniversary: लोकप्रिय बंगाली अभिनेत्री अँड्रिला शर्माचे निधन गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये केवळ मनोरंजन विश्वच नव्हे तर सर्वांच्या मनाला चटका लावणारे ठरले. वयाच्या अवध्या २४ व्या वर्षी अभिनेत्री अँड्रिलाने अखेरचा श्वास घेतला. ब्रेन स्ट्रोक आणि मल्टिपल कार्डियाक अरेस्टमुळे (अनेकदा आलेला हृदयविकाराचा झटका) अभिनेत्रीचा २० नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. जवळपास २० दिवस ती कोलकाता याठिकाणी असणाऱ्या नारायण सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होती. याआधी तिने दोन वेळा कॅन्सरवर मात केलेली, यावेळी मात्र हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकमुळे अभिनेत्रीची झुंज अपयशी ठरली. वयाच्या २४ व्या वर्षी अँड्रिलाने अखेरचा श्वास घेतला. कॅन्सरवर दोन मात करण्याचा तिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी होता. त्यामुळे तिचे निधन केवळ तिच्या कुटुंबियांसाठीच नव्हे तर तिच्या चाहत्यांसाठीही धक्कादायक होते.

ब्रेन स्ट्रोकनंतर नेमके काय झाले?

ब्रेन स्ट्रोकमुळे अँड्रिलाच्या मेंदूमध्ये इंट्राक्रॅनियल रक्तस्त्राव झाल्याचे समोर आलेले. त्यावेळी अँड्रिलावर शस्त्रिक्रियाही करण्यात आलेली. तिच्या सीटी स्कॅन रिपोर्टनुसार अभिनेत्रीच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या झाल्याचे समोर आले. यापूर्वीही अँड्रिलाच्या मेंदूच्या एका भागावर शस्त्रक्रिया झालेली आणि तिच्या मृत्यूआधी काहीदिवस त्या भागाच्या उलट ठिकाणी गुठळ्या तयार झाल्या होत्या. डॉक्टरांनी असे सांगितले होते की, नव्याने तयार झालेल्या गुठळ्यांवर शस्त्रक्रिया करणे कठीण आहे. मात्र त्या कमी करण्यासाठी तिच्यावर औषधोपचार केले गेले. अभिनेत्री या परिस्थितीतून वाचू शकली नाही.

पीएनईटी कर्करोगाचे निदान

पीएनईटी कर्करोगाचे निदान

२०२२ मध्ये जगाचा निरोप घेणाऱ्या अँड्रिला शर्माने २०१५ मध्ये पहिला मोठा आघात सहन केला. त्यावेळी तिला पीएनईटी कर्करोगाचे निदान झाले होते. तिने केमोथेरपी करून ही लढाई जिंकली होती. कॅन्सरची लढाई दोन वेळा जिंकणारी अँड्रिला अनेक कर्करोग झालेल्या रुग्णांसाठी प्रेरणा ठरलेली त्यामुळे तिच्या अशा जाण्याने सारा देश हळहळला.

२०२१ मध्ये झालेला कर्करोग

२०२१ मध्ये झालेला कर्करोग

त्यानंतर २०२१ मध्ये मे मध्ये अँड्रिलावर कर्करोगासाठी सर्जरी केली गेली. ‘जियो कथी’ मालिकेच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीने खांदेदुखीची समस्या जाणवत असल्याचे सांगितले. अभिनेत्रीच्या आई-वडिलांनी तातडीने तिला दिल्लीत उपचारासाठी आणले, त्यावेळी जे समोर आले ते धक्कादायक होते. अँड्रिलाच्या फुफ्फुसात ट्यूमरचे निदान करण्यात आले आणि पुढील वैद्यकीय रिपोर्टमध्ये कर्करोगाच्या पेशी असल्याचे सूचित केले गेले. मात्र काही महिन्यातच अँड्रिलाने कर्करोगावर मात केली होती.

बॉयफ्रेंडने दिली शेवटपर्यंत साथ

बॉयफ्रेंडने दिली शेवटपर्यंत साथ

अभिनेता सब्यासाची चौधरी आणि अँड्रिला अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यांची भेट अँड्रिलाच्या पदार्पणाच्या मालिकेवेळी झाली होती. त्यांनतर झालेल्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. अभिनेत्रीची कॅन्सरशी आणि त्यानंतर सुरू झालेल्या मृत्यविरोधातील लढाईत सब्यासाची शेवटच्या क्षणापर्यंत अभिनेत्रीसोबत होता. तिला रुग्णायात भरती केल्यानंतर सब्यासाचीने तिच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही केले होते. त्यानेच तिचे पार्थिव रुग्णालयातून तिच्या कुडघाटमधील निवासस्थानी आणले. अँड्रिलाला अखेरचा निरोप देताना त्याचे अश्रू थांबत नव्हते अन् तिच्या पायाचे चुंबन घेत त्याने अँड्रिलाला अखेरचा निरोप दिला होता.

मालिका विश्वात लोकप्रिय होती अँड्रिला

मालिका विश्वात लोकप्रिय होती अँड्रिला

अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या २४ वर्षांमध्ये विशेष लोकप्रियता मिळवली होती. तिने ‘झुमुर’द्वारे टीव्ही विश्वात पाऊल टाकले होते. तर ‘जीवन ज्योती’ आणि ‘जिओ कथी’ हे तिचे सर्वाधिक गाजलेले कार्यक्रम आहेत. शिवाय अभिनेत्रीने काही चित्रपट आणि ओटीटीवरही काम करत लोकप्रियता मिळवली. याशिवाय अँड्रिला सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असयाची.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.