Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, जिल्हाधिकाऱ्यांकडून महत्त्वाच्या सूचना

8

म. टा. प्रतिनिधी, पुणे: कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, या वर्षी मोठ्या प्रमाणावर अनुयायी येण्याची शक्यता लक्षात घेऊन अधिक प्रमाणात सुविधा करण्यात आल्या आहेत. या सुविधांचा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शनिवारी परिसराला भेट देऊन आढावा घेतला.

‘जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी शिक्रापूर येथील वाहनतळ आणि विजयस्तंभ परिसराची पाहणी केली. स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची पुरेशा सुविधा राहील याची दक्षता घ्यावी. नागरिकांना माहिती देण्यासाठी सूचना फलक ठिकठिकाणी लावावेत. गर्दीचे नियोजन योग्य पद्धतीने होण्यासाठी पीएमपीएमल बसेसच्या फेऱ्या सुरू राहतील याची दक्षता घ्यावी,’ अशा सूचना डॉ. देशमुख यांनी दिल्या. या वेळी ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, ‘बार्टी’चे विभागप्रमुख डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण, निबंधक इंदिरा अस्वार आदी उपस्थित होते.

अग्निशमन दलाचे जवान रांगत-रांगत वर पोहोचले, समोर कोळसा झालेले सहा मृतदेह अन् कुत्रा

प्रशासन सज्ज

सोहळ्याच्या ठिकाणी २९ ठिकाणी आरोग्य कक्ष, २० फिरते दुचाकी आरोग्य पथक, ५० रुग्णवाहिका, ९० तज्ज्ञ डॉक्टर आणि २०० आरोग्य कर्मचारी नियुक्त केलेले आहे. खासगी रुग्णालयांत १०० खाटा आरक्षित केल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी १५० टँकरची व्यवस्था करण्यात आली असून, परिसरात २२०० तात्पुरत्या शौचालयांची उभारणी केली आहे. वापराच्या पाण्यासाठी ४० टँकर, स्वच्छतेसाठी ४० सक्शनमशिन,, १५ जेटिंग मशिन ठेवण्यात आले आहेत. कचऱ्यासाठी ५०० कचराकुंड्या ठेवल्या असून, २०० कामगार नियुक्त करण्यात आले आहेत. कचरा उचलण्याकरिता ८० घंटागाड्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

सुरक्षा व्यवस्थेचा पाहणी

पोलिसांकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, नागरिकांना सूचना देण्यासाठी ठिकठिकाणी ध्वनिक्षेपकांची व्यवस्था करण्यात आली आहे. ‘सीसीटीव्ही’द्वारे परिसरावर नजर राहणार असून, त्यासाठी सुसज्ज नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. पुरेशा प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुणे शहर पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी विजयस्तंभ परिसराची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. या वेळी प्रभारी पोलिस सहआयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अरविंद चावरिया आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांसमोर जगण्याचा प्रश्न, अस्वस्थ शेतकऱ्यांकडे सरकार ढुंकुणही पाहत नाही, शरद पवारांचा हल्लाबोल

महत्त्वाचे…

– सह्याद्री वाहिनीवरून एक जानेवारीला सकाळी सहा ते दुपारी १२ वाजेपर्यंत सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

– सकाळी ६.३० वाजता पाहुणे विजयस्तंभास अभिवादन करतील.

– सकाळी ९.३० वाजता ‘डॉ. बी. आर. आंबेडकर विज्डम बुकफेअर’चे उद्घाटन होईल.

– डॉ. आंबेडकर लिखित ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या ग्रंथाच्या शताब्दी वर्षानिमित्त विजयस्तंभ परिसरात पुस्तकांचे ३०० स्टॉल उभारण्यात आले आहेत.

खासदार सुप्रिया सुळेंची ‘चाय पे चर्चा’, टपरीवर चहाचा आस्वाद घेत चहा विक्रेत्यासोबत गप्पा

Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.